बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यात 31 महिलांसह 35 ठार 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 डिसेंबर 2019

बुर्किना फासोचे अध्यक्ष रोच मार्क काबोर यांनी या हल्ल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. नागरिकांच्या मृत्यूमुळे त्यांनी देशात देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. देशातील सैन्याने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलांचे आठ सैनिक मारले गेले.

वागडुगू (बुर्किना फासो) : बुर्किना फासामधील अरबिंदा शहरात बुधवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 35 निरपराध नागरिक ठार आहे. यात 31 महिलांचा समावेश आहे. सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 80 दहशतवादी व आठ सैनिकही मारले गेल्याचे सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुर्किना फासोचे अध्यक्ष रोच मार्क काबोर यांनी या हल्ल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. नागरिकांच्या मृत्यूमुळे त्यांनी देशात देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. देशातील सैन्याने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलांचे आठ सैनिक मारले गेले. आजच्या हल्ल्यात ठार झालेल्या 35 नागरिकांमध्ये 31 महिलांचा समावेश आहे. हल्ला झाला त्या वेळी त्या ठिकाणी त्या काय करीत होत्या किंवा हल्ल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कशा ठार झाल्या हे अद्याप समजलेले नाही. 

Image result for burkina faso

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील आले एकत्र; काय झाली चर्चा?

बुर्किना फासोमध्ये गेल्या पाच वर्षांतील हा सर्वांत भयानक दहशतवादी हल्ला असल्याचे येथील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पश्‍चिम आफ्रिकी देश असलेल्या बुर्किना फासोमध्ये अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहे. तेथे रक्तरंजित संघर्षाच्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहे. देशाची राजधानी वागडुगू येथे 2016 व 2017 मध्ये दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले होते. परदेशी नागरिकांचे आकर्षण असलेल्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big jihadi terrorist attack in African country Burkina Faso 35 people killed