Viral Video : खलिस्तान्यांची जिरवली! लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

big slap to Khalistan supporters huge tricolor indian flag displayed at indian embassy in london video goes viral

Viral Video : खलिस्तान्यांची जिरवली! लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा

Indian Flag In Uk Viral Video : लंडनमध्ये तिरंगा खाली उतरवणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर लावण्यात आलेला तिरंगा खलिस्तानवाद्यांनी काढला होता. मात्र, आता या इमारतीवर पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा फडकावून खलिस्तानी समर्थकांना सडेतोड उत्तर देण्यात आलं.

रविवारी या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. ज्यामध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडून तिरंगा कसा हटवण्यात आला हे या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेत तिरंग्याच्या जागी खलिस्तानी ध्वज लावण्यात आला होता.

नेमकं प्रकरण काय आहे?

यूकेमधील खलिस्तान समर्थकांच्या एका गटाने रविवारी (19 मार्च) भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. त्यांनी फुटीरतावादी नेता अमृतपाल यांचे झेंडे आणि पोस्टरसह घोषणाबाजी केली. अमृतपाल सिंग यांचे फोटो असलेल्या या पोस्टरवर फ्री अमृतपाल सिंग, वी वाँट जस्टिस, वी स्टँड विद अमृतपाल सिंह असा मजकूर लिहील होता.

भारतीय उच्चायुक्ताबाहेर निदर्शने करत असताना खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. व्हायरल व्हिडिओमध्ये खलिस्तानी भारताचा ध्वज खाली खेचताना देखील दिसत आहेत.

अमृतपालच्या समर्थकांना अटक

पंजाबमध्ये या आठवड्यात रविवार (19 मार्च) पर्यंत अमृतपालच्या एकूण 112 समर्थकांना अटक करण्यात आली आहे, हे सर्व अमृतपाल सिंगचे कट्टर समर्थक मानले जातात. दरम्यान फरार खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह अजूनही फरार असल्याचा दावा पंजाब पोलीस करत आहे. मात्र अमृतपालला अटक करण्यात आल्याचं 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या वकीलाचा दावा आहे.

भारताने बजावल समन्स

लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय ध्वज खाली खेचल्याने परराष्ट्र मंत्रालयाने काल संध्याकाळी उशीरा दिल्लीतल्या ब्रिटनच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला समन्स बजावलं आहे. फुटीरतावादी अमृतपाल सिंग याच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी ध्वज खाली खेचला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रालयाने उच्चायुक्तालयातल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल तीव्र शब्दात सुनावलं आहे. भारतीय अधिकारी आणि राजदूतांबद्दल ब्रिटनची उदासीन भूमिका अस्वीकारार्ह असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

टॅग्स :Londonviral video