पाकिस्तानातील कंडोम टॅक्सनंतर बिलावल भुट्टो भडकले म्हणाले, 'प्लेबॉय' कडून ही अपेक्षा नव्हती l Bilawal Bhutto Zardari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिलावल भुट्टो भडकले म्हणाले, 'प्लेबॉय' कडून ही अपेक्षा नव्हती

बिलावल भुट्टो भडकले म्हणाले, 'प्लेबॉय' कडून ही अपेक्षा नव्हती

इस्लामाबाद : इम्रान खान (Imran Khan) सरकार 'टॅक्सची सुनामी' आणणार आहे. पीटीआय सरकारने कंडोमवरही जास्त कर लावला, ज्याची 'प्लेबॉय' कडून अपेक्षा नव्हती, अशी खरमरीत टिका पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्ष पीपीपीचे (Pakistan Peoples Party) नेते बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari)यांनी केली आहे. इम्रान खान हे पाकिस्तानसाठी (Pakistan)शतकातील सर्वात मोठी शोकांतिका आहे, असा ही हल्लाबोल बुधवारी (ता. १२) मिनी बजेटच्या वेळी संसदेत केला. यावेळी विरोधकांनी गदारोळ केला.

बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले, नॅशनल असेंब्लीमध्ये फायनान्स बिल 2021 अंतर्गत, इम्रान खान सरकारने 144 वस्तूंवर 17 टक्के दराने जीएसटी लागू केला. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमचाही (Higher Taxes On Condoms)समावेश आहे. इम्रानसारख्या खेळाडूकडून गर्भनिरोधकांवर कर लावावा, अशी अपेक्षा नव्हती. एचआयव्हीचे संकट येऊ नये म्हणून जगभरात गर्भनिरोधक विषयी प्रचार केला जात आहे, मात्र पाकिस्तान सरकार यावर कर लादत आहे. देशातील अनेक भागांमध्ये ही गंभीर समस्या आहे. शिवाय पाकिस्तानातील एका शहरात एचआयव्ही ग्रस्तांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

पुढे ते म्हणाले, इम्रान खान पंतप्रधान होण्यापूर्वी 'प्लेबॉय' इमेजसाठी प्रसिद्ध होते. इम्रानने अधिकृतपणे 3 लग्ने केली आहेत. मात्र त्यांचे अनेक महिलांसोबतही संबंध आहेत. यापूर्वी इम्रान खान यांनी दिलेल्या बलात्काराच्या वक्तव्यावर पाकिस्तानी वंशाचे लेखक तारिक फताह म्हणाले होते की, 'पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटा. जगभरातील महिलांसोबत अगणित लैंगिक कृत्ये करणारा इम्रान खान सध्या तिसऱ्या पत्नीसोबत आहे. आपल्या देशातील महिलांना बलात्कारापासून वाचवण्यासाठी तो बुरख्याचा प्रचार करत आहे.

हेही वाचा: प्रिन्स अँड्र्यूंच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने खटला फेटाळला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानला अमेरिकन महिला सिंथिया डी रिचीसोबत सेक्स करायचे होते, असे पाकिस्तानी टीव्ही होस्ट अली सलीम (बेगम नवाजीश) यांनी दावा केला होता. सिंथिया स्वतःला पाकिस्तान प्रेमी, साहसी, चित्रपट निर्माते असल्याचा दावा करते. ती बराच काळ इस्लामाबादमध्ये राहते. तिला आयएसआयचे संरक्षण असल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top