Bilawal Bhutto In India : १२ वर्षांनंतर पाकिस्तानचे पराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर, थेट गोव्याला पोहचणार

bilawal bhutto zardari significance of bilawal bhutto india visit sco foreign minister meet india pakistan relation
bilawal bhutto zardari significance of bilawal bhutto india visit sco foreign minister meet india pakistan relation

गोवा येथे ४ आणि ५ मे रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मत्र्यांची बैठक होणार आहे. विशेष बाब म्हणजे या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी हे देखील सहभागी होणार आहेत. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार बिलावल भुट्टो गुरूवारी दुपारी दोन वाजता कराचीहून निघतील आणि संध्याकाळी पाच वाजता ते गोव्यात पोहचतील.

दरम्यान १९४७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. सध्या भारत पाकिस्तान संबंध आजवरच्या काळात सर्वाधिक खराब असताना बिलावर भुट्टो यांचा हा दौरा होत आहे, त्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. बऱ्याच वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानाच्या नेत्यांनी त्या-त्या देशांचा दौरा देखील केलेला नाहीये.

या पार्श्वभूमिवर बिलावल भुट्टो यांचा हा भारत दौरा किती महत्वाचा आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. नेमकं या दौऱ्याचा उद्देश काय आहे? पाकिस्तानला यातून काय फायदा होणार आहे? हे आपण जाणून घेऊया.

bilawal bhutto zardari significance of bilawal bhutto india visit sco foreign minister meet india pakistan relation
PM Modi News : तेव्हा बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता, आता PM मोदी…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत दौरा खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 12 वर्षांनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात येत आहेत. भुट्टोच्या आधी हिना रब्बानी खार 2011 मध्ये भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांची भेट घेतली होती.

बिलावल भुट्टोपूर्वी त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य भारतात आले होते. 1972 मध्ये बिलावल भुट्टो यांचे आजोबा आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो भारतात आले होते. 1971 च्या युद्धानंतर १९७२ शिमला करारावर सही करण्यासाठी त्यांनी भारत दौरा केला होता.

तर 2002 मध्ये बिलावल यांच्या आई आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनजीर भुट्टो भारतात आल्या होत्या. त्या काळात त्यांनी भारताचे तात्कालिन प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी यांची भेट घेतली होती. तर २०१२ मध्ये बिलावल यांचे वडिल आसिफ अली जरदारी हे भारतात आले होते, त्यांच्या सोबत बिलावल भुट्टो देखील होते. आसिफ अली जरदारी यांनी तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भेट घेतली होती.

bilawal bhutto zardari significance of bilawal bhutto india visit sco foreign minister meet india pakistan relation
Gautam Gambhir Tweet : प्रेशरचं कारण देऊन दिल्ली क्रिकेटमधून पळालेला…; गंभीरचं सूचक ट्वीट चर्चेत

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारतात येत आहेत. या बैठकीत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आणि चीनचे परराष्ट्र मंत्री क्लीन गांग देखील सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बिलावल भुट्टो हे फक्त याच बैठकीत सहभागी होतील. त्यांची भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत थेट द्विपक्षीय बैठक होणार नाहीये.

याचे मुख्य कारण हे दहशदवाद आहे. पाकिस्तानसोबत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याखेरीज इतक कोणत्याही विषयावर पाकिस्तानसोबत द्विपक्षीय बोलणी होणार नाही अशी भूमिका भारताकडून घेण्यात आली आहे.

bilawal bhutto zardari significance of bilawal bhutto india visit sco foreign minister meet india pakistan relation
Sharad Pawar : निवृत्तीच्या घोषणेनंतर पवारांचं सूचक विधान; दोन दिवसांनंतर तुम्हाला...

भारत भेटीचं कारण काय आहे?

या भेटीमागचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान ही बैठक टाळू शकत नाही. कारण या बैठकीत चीन आणि रशिया यांचे परराष्ट्र मंत्री देखील सहभागी गोत आहेत. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे पाकला रशिया आणि चीनची गरज आहे. बिलावल भुट्टो हे भारतीय परराष्ट्रमंत्र्यांना भेटणार नाहीयेत, त्यामुळे त्यांचा भारत दोरा गा फक्च SCO मिटींगमध्ये सहभागी होणं एवढाच असल्याचे दिसून येत आहे. याचा भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यावर काहीही परिणाम होईल असे दिसत नाही. मात्र या दौऱ्यावा पाकिस्तानकडून भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com