Turkey-syria Earthquake : नशीबच बलवत्तर! भूकंपातील ढिगाऱ्याखाली मातेने दिला बाळाला जन्म, पण...

Turkey-syria Earthquake
Turkey-syria Earthquake

नवी दिल्ली: भूकंपग्रस्त सीरियात घराच्या ढिगाऱ्याखाली बाळाला जन्म दिल्यानंतर एका आईचा मृत्यू झाला आहे. मात्र, मदत आणि बचाव पथकाने त्या बाळाला वाचवले. सीरियाच्या गेंड्रिस शहरात बाळाची त्याच्या मृत आईला जोडलेली नाळ कापून बाळाची सुटका करण्यात आली. Turkey-syria Earthquake news in Marathi

Turkey-syria Earthquake
Turkey-syria Earthquake : भूकंपबळींची संख्या नऊ हजारांवर

बाळाच्या वडील आणि भावंडांचाही विनाशकारी भूकंपात मृत्यू झाला आहे. बाळाचे नाव अया असे ठेवण्यात आले आहे. अया म्हणजे इंग्रजीत 'चमत्कार'.

वडील काका करणार सांभाळ

अयाच्या वडिलांचे काका म्हणाले की, बाळाच्या कुटुंबातील सर्व सदस्य मरण पावले असल्याने तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते तिला घरी घेऊन जातील. सलाह अल-बद्रनचे स्वतःचे घरही भूकंपात उद्ध्वस्त झाले असून ते सध्या कुटुंबासह तंबूत राहत आहे. अयाच्या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फुटेजमध्ये चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्यातून एक माणूस पळताना एका लहान मुलाला धुळीने झाकून ठेवताना दिसत आहे. दुसरा माणूस गोठवणाऱ्या थंडीत नवजात बाळासाठी ब्लँकेट घेऊन धावतो, तर तिसरा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी गाडीसाठी ओरडतो.

Turkey-syria Earthquake
Praniti Shinde: कोण रोहित पवार? प्रणिती शिंदेनी पोरकटपणा म्हणत केली टीका!

डॉक्टरच्या पत्नीने पाजलं दुध

व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो लोकांनी मुलगी दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे. . मुलीला उपचारासाठी जवळच्या आफरीन शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, थंडी वाजत होती आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. सध्या एका डॉक्टरची पत्नी बाळाला दूध पाजत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com