एलॉन मस्क यांचं एक ट्विट आणि बिटकॉईन कोसळला

एलॉन मस्क यांचं एक ट्विट आणि बिटकॉईन कोसळला

एलॉन मस्क यांचं एक ट्विट म्हणजे लाखमोलाचं असतं. कारण त्यांच्या एका ट्विटमध्ये शेअर मार्केटमध्ये उलथापालथ घडवायची ताकद असते. याआधी याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. टेस्ला (Tesla) कंपनीचे मालक आणि सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अलिकडेच आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन (Bitcoin) स्विकारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये चांगलीच उसळी मारलेली पहायला मिळाली. बिटकॉईनने देखील जबरदस्त गती घेतलेली पहायला मिळाली. निव्वळ आपल्या एका ट्विटने क्रिप्टो आणि शेअर मार्केटमध्ये चढ-उतार आणण्याची क्षमता ठेवणाऱ्या एलॉन मस्क यांनी मात्र, आपल्या विधानावरुन आता यू-टर्न घेतला आहे. कंपनीने आता घोषणा करत म्हटलंय की, इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्यासाठी बिटकॉईनच्या स्वरुपात पैसे स्विकारले जाणार नाहीत. (Bitcoin fell more than 10 percent after Elon Musk tweeted his decision to suspend use)

एलॉन मस्क यांचं एक ट्विट आणि बिटकॉईन कोसळला
दिल्लीचा ऑक्सिजन इतर राज्यांना द्या; मनीष सिसोदिया असं का म्हणाले?

एलन मस्क यांच्या या ट्विटमुळे फक्त दोन तासांच्या आतच आभासी चलन बिटकॉईनमध्ये कमालीची घसरण पहायला मिळाली आहे. मस्क यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बिटकॉइनची किंमत 17 टक्क्यांनी घसरली आहे. बिटक्वाइनची किंमत 54,819 डॉलरवरून थेट 45,700 डॉलरवर घसरली आहे. टेस्ला कंपनीचे मालक आणि सीईओ एलॉन मस्क यांनी गुरुवारी एक ट्विट केलं आणि आपल्या ग्राहकांना सांगितलं की, टेस्ला कारची खरेदी करताना ग्राहक बिटकॉईनच्या स्वरुपात आता पैसे देऊ शकणार नाहीत. या पावलामागे पर्यावरणाचं कारण सांगितलं गेलं आहे. कंपनीने गेल्या मार्च महिन्याच्या अखेरिस अशी घोषणा केली होती की, टेस्ला कार खरेदी करण्यासाठी बँक कार्डसोबतच क्रिप्टोकन्सी बिटकॉईन देखील स्विकारार्ह राहिल. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आल्यामुळे ग्राहकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

या ट्विटमध्ये एलॉन मस्क यांनी म्हटलंय की, ‘टेस्ला कंपनी आता बिटकॉईन स्वरुपात पेमेंट घेणार नाही. बिटकॉईनचा वापर खाणकाम आणि ट्रान्झेक्शनसाठी जीवाश्म इंधनात मोठ्या प्रमाणात वापर होत असून ही एक चिंतेची बाब आहे. कोळश्याच्या माध्यमातून सर्वाधिक खराब उत्सर्जन होतं.’ त्यांच्या या ट्वीटनंतर बिटकॉईनमध्ये मोठी पडझड झाली आहे.

एलॉन मस्क यांचं एक ट्विट आणि बिटकॉईन कोसळला
'Narendra Modi देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता'

मात्र, या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनी भविष्यात क्रिप्टोकरन्सी पुन्हा एकदा घेण्यास सुरुवात करु शकते तसेच बिटकॉईनसोबतच कंपनीची इतर काही क्रिप्टोकरन्सीवर देखील नजर आहे, ज्या बिटकॉईनच्या उर्जा/देवघेवीचा <1% वापर करतात.

याशिवाय एलॉन मस्क यांनी असंदेखील म्हटलंय की, कंपनीने वर्षाच्या सुरवातीला खरेदी केलेल्या आपल्या 1.5 बिलियन डॉलर किंमतीच्या बिटकॉईन्सची विक्री करणार नाही. टेस्लाने या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये आपल्या तीन महिन्याचा लाभ वाढवण्यासाठी काही बिटकॉईन्सची विक्री केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com