Wall Street Journal : "BJP जगातला सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष"; फक्त WhatsApp च नाही तर अमेरिकेतही गाजावाजा | BJP is worlds most important party Wall Street Journal America | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah
Wall Street Journal : "BJP जगातला सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष"; फक्त WhatsApp च नाही तर अमेरिकेतही गाजावाजा

Wall Street Journal : "BJP जगातला सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष"; फक्त WhatsApp च नाही तर अमेरिकेतही गाजावाजा

Wall Street Journal on BJP : भाजपा हा जगातला सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे, पण अजून याच्याबद्दल लोकांना फार काही समजलेलं नाही, असं 'वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये म्हटलं आहे. या मॅगझिनमध्ये वॉल्टर रुसेल मीड यांनी लिहिलेल्या एका लेखामध्ये हा उल्लेख कऱण्यात आला आहे.

भारतातली सत्ताधारी भारतीय जनता पार्टी अमेरिकी राष्ट्रीय हितांच्या दृष्टिकोनातून जगातला सर्वात महत्त्वपूर्ण विदेशी राजकीय पक्ष आहे. याबद्दल लोकांना जास्त काही माहिती नाही, असंही असू शकतं, असं या लेखात म्हटलं आहे.

भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा सत्ता मिळवली आहे आणि आता २०२४ मध्येही भाजपाच सत्तेवर येणार असंही या लेखात म्हटलं आहे. भारत सध्या एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. येणाऱ्या काळात भाजपा एका अशा देशात आपला दबदबा निर्माण करत आहे, ज्याच्या मदतीशिवाय चीनच्या वाढत्या शक्तीला रोखण्याचे अमेरिकेचे प्रयत्न अयशस्वी ठरू शकतात.

मीड यांच्या म्हणण्यानुसार, भाजपा अजूनही बहुतांश लोकांना अपरिचित आहे. कारण अधिकाधिक परदेशी लोकांना माहित असलेल्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाशी या पक्षाचं साधर्म्य नाही.

टॅग्स :Bjp