Blast In Pakistan : पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसमध्ये भीषण स्फोट; 2 ठार चौघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Blast In Pakistan

Blast In Pakistan : पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसमध्ये भीषण स्फोट; 2 ठार चौघे जखमी

Blast In Pakistan : पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसमध्ये भीषण स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जाफर एक्स्प्रेस चिचवतनी रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. पेशावरहून क्वेटाकडे ही एक्सप्रेस निघाली होती.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

जाफर एक्सप्रेस क्वेटाकडे जात असताना हा स्फोट झाला असून, यामध्ये दोन प्रवाशांसह चार जण जखमी झाले आहेत.

प्रकाशित वृत्तनुसार, जाफर एक्सप्रेसच्या इकॉनॉमी क्लासच्या बोगी क्रमांक 6 मध्ये हा स्फोट झाला असून, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून किमान चार जण जखमी झाले आहेत.

हा स्फोट नेमका कशाचा होता आणि कुणी केला याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नसून, जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिनाभरात दुसरी घटना

क्वेट्टाला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसला लक्ष्य करून स्फोट झाल्याची महिन्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी 30 जानेवारीला बलुचिस्तानमधील कच्छी जिल्ह्यातील माच परिसरात जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये आठ प्रवासी जखमी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने दहशतवादी हल्ले केले जात आहेत. यामागे दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला (TTP) जबाबदार धरण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात एका मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 100 हून अधिक लोक मारले गेले होते, ज्यात बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.