मलेशियात चीनच्या पर्यंटकांचे जहाज बेपत्ता

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

खराव वातावरणामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. जहाजाच्या शोधासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे जहाज बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सबाह (मलेशिया) - मलेशियातील बोरनेओ किनाऱ्याजवळ 31 पर्यंटकांना घेऊन जाणारे बेपत्ता झाले असून, हे जहाज बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जहाजांत 31 पैकी 28 पर्यटक चीनमधील आहेत.

मलेशिया सागरी अंमलबजावणी संस्थेचे उपप्रमुख रहिम रामली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊच्या सुमारास कोटा किनाबालू येथे ही दुर्घटना घडली. मेंगालूम बेटावर हे सर्व पर्यटक जात होते. मलेशियातील हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हे जहाज या बेटावर पोहचले नसल्याने जहाजाचा शोध घेण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकारी जहाजाचा शोध घेत आहेत.

खराव वातावरणामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. जहाजाच्या शोधासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे जहाज बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Boat carrying 28 Chinese tourist missing off Malaysia