...तो मृतदेह माझ्या अंगावर पडला असता तर

Body found in London garden is a stowaway who fell from Heathrow
Body found in London garden is a stowaway who fell from Heathrow

लंडन : केनिया एअरवेजच्या विमानातून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 30) घडली. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. तो निर्वासित असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तो मृतदेह माझ्या अंगावर पडला असता तर माझाही मृत्यू झाला असता, असे एकाने सांगितले.

नैरोबीहून उड्डाण केलेले केनिया एअरवेजचे 787 विमान हिथ्रो विमानतळावर स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास उतरण्याच्या तयारीत होते. ते विमान 3500 फूट उंचीवर असताना 200 मीटर प्रतितास वेगाने वळत असताना लॅंडिग गिअर कंपार्टमेंटमध्ये असलेला एक नागरिक खाली कोसळला. तो एका घराच्या बगीचात पडला. त्याच वेळी घरमालक बगीचात ऊन घेत बसला होता. आकाशातून एक मृतदेह आपल्यापासून तीन फूट अंतरावर पडल्याचे पाहून तो हादरला. या संदर्भात घरमालक म्हणाला, की मी नशिबवान आहे की तो मृतदेह माझ्या अंगावर पडला नाही. त्यात माझाही मृत्यू झाला असता. तो मृतदेह एवढ्या वेगात खाली पडला की लॉनला भेग पडली. आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की घटना घडली तेव्हा मी घरात झोपलो होतो. जोरात आवाज आल्याने घराबाहेर आलो. तेव्हा मित्रापासून काही फुटांवरच छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पडला होता. माझा मित्र थरथर कापत होता. बगीचाच्या भिंतीवर रक्त उडाले होते. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट झाली होती, की ते पुरुष आहे की महिला हे ओळखणेदेखील कठीण गेले.

पोलिस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, केनिया एअरवेच्या लॅंडिग गिअर कपार्टमेंटमध्ये लपलेला व्यक्ती हा निर्वासित असावा. अन्य देशात जाण्यासाठी विमानात अशा ठिकाणी लपतात. जेव्हा विमान उतरण्याच्या तयारीत होते, तेव्हा हा व्यक्ती पडला असावा. या कंपार्टमेंटमधून एक बॅग, पाणी आणि काही खाण्या-पिण्याचे सामानही जप्त झाले आहे. हिथ्रो विमानतळाने दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची घटना पाच वर्षांतून एकदातरी होते. संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा विमानात झाला की खाली पडल्यानंतर झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. जर तो जिवंत असेल, तर त्याने उणे 60 अंश तापमानात कमी ऑक्‍सिजनचा सामना करत 9 तास घालविले असतील, असा पोलिसांनी अंदाज बांधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com