बोको हरामकडून 82 शाळकरी मुलींची सुटका

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

दहशतवाद्यांनी सुटका केलेल्या मुलींची अबुजा येथे वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. एप्रिल 2014 मध्ये चिबोक येथून 276 मुलींचे अपहरण करण्यात आले होते.

न्यूयॉर्क - बोको हराम या दहशतवादी संघटनेने शनिवारी नायजेरियातील चिबोक शहरातून अपहरण केलेल्या 82 शाळकरी मुलींची सुटका केली. या मुली गेल्या तीन वर्षांपासून बोको हरामच्या कैदेत होत्या.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरिया सरकार आणि बोको हराम यांच्यात सतत या मुलींच्या सुटकेबाबत चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला यश आले असून, संघटनेने 82 मुलींची सुटका केली आहे. ईशान्य नायजेरियातील बांकी येथे मुलींची दहशतवाद्यांकडून सुटका करण्यात आली.

दहशतवाद्यांनी सुटका केलेल्या मुलींची अबुजा येथे वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. एप्रिल 2014 मध्ये चिबोक येथून 276 मुलींचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेनंतर 'ब्रिंगबॅकआवरगर्ल्स' हे अभियान राबविण्यात आले होते. 

Web Title: Boko Haram Militants Release 82 Chibok Schoolgirls In Nigeria