Blast in Iraq : इराकमधील स्फोटात 11 जण ठार

Blast in Iraq
Blast in Iraqesakal
Summary

इराकमध्ये (Iraq) गुरुवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात (Blast in Iraq) 11 जणांचा मृत्यू झालाय.

इराकमध्ये (Iraq) गुरुवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात (Blast in Iraq) 11 जणांचा मृत्यू झालाय. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (Islamic State) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. याआधी मंगळवारी इराकमधील दक्षिणेकडील बसरा शहरात (Basra City) भीषण स्फोट झाला. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचं इराकी लष्करानं सांगितलं होतं. त्यामुळं एक जबरदस्त स्फोट झाला. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटनं स्वीकारली नव्हती.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओत स्फोटानंतर सर्वत्र धुराचे लोट दिसताहेत. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनं सांगितलं की, बसरा शहरातील स्फोटात 20 लोक जखमी झाले आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या अल-जुमहौरी रुग्णालयासमोर (Al-Jumhouri Hospital) हा स्फोट झाल्याचं लष्करानं सांगितलंय. दरम्यान, स्फोटानंतर लगेचच घटनास्थळाला वेढा घातला गेला आणि त्यानंतर या स्फोटामागील कारणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. बसराचे गव्हर्नर असद अल-इदानी यांनी सांगितलं की, या स्फोटात इस्लामिक स्टेटचा हात आहे आणि त्यांनीच हा स्फोट घडवून आणला आहे.

Blast in Iraq
Blast in Iraq
Blast in Iraq
मेक्सिकोत ट्रकचा भीषण अपघात; 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात सुरू असलेली मोहीम संपुष्टात आलीय. आता अमेरिकन सैन्य इराकी सैन्याला प्रशिक्षण आणि सल्ला देण्याच्या भूमिकेकडं परत येईल, असा विश्वास इराकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी गुरुवारी व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधिमी (Mustafa Al-Kadhemi) यांनी जुलैमध्ये वॉशिंग्टनमध्ये (Washington) अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची भेट घेतली होती.

Blast in Iraq
Railway Scene च्या शूटिंगसाठी किती पैसे मोजावे लागतात माहितीय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com