भारत-यूएई दरम्यान सुरक्षा सहकार्याला चालना

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

संरक्षण उद्योग, युद्धसामग्री, सायबरस्पेससह 13 करारांवर सह्या

नवी दिल्ली : सुरक्षा सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या दोन्ही देशांदरम्यान बुधवारी सायबरस्पेस, युद्धसामग्री, संरक्षण उद्योग आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यासंबंधी करारावर सह्या झाल्या.

दोन्ही देशांदरम्यानचे करार एका नव्या भरारीचे संकेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी आणि अबूधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान यांच्या दरम्यान आज झालेल्या चर्चेनंतर करारावर सह्या झाल्या.

अल नाहयान यांच्याबरोबर झालेली चर्चा यशस्वी तसेच उपयुक्त ठरल्याचे नमूद करून मोदी यांनी चर्चेदरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या व्यापक विस्तारावर चर्चा झाल्याचे सांगितले. भारत आणि यूएईत पुढील काळात संरक्षण सहकार्यातही वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारत आणि यूएईमध्ये संरक्षण, बंदरे, सायबर, वाणिज्य यांसह तेरा क्षेत्रांबाबत महत्त्वाचे करार झाले. युवराज नहयान आणि पंतप्रधान मोदी यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापार, दहशतवाद आणि मुस्लिम कट्टरतावादावर भाष्य करून अप्रत्यक्षपणे शेजारी देशांवर निशाणा साधला. यूएई हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आणि जवळचा मित्र आहे. यूएई हा भारताच्या विकासातील महत्त्वाचा भागीदार आहे. मूलभूत क्षेत्रात त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो, असेही पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.

मंदिरासाठी युवराजांचे आभार
अबुधाबीत मंदिरासाठी जमीन देणारे अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. भारताच्या विकासात संयुक्त अरब अमिरातीचे महत्त्वाचे योगदान आहे, असेही ते म्हणाले. अल नाहयान उद्या (गुरुवारी) होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

Web Title: Boost security cooperation between India and the UAE