ब्रिटनचे पंतप्रधान तिसऱ्यांदा बोहल्यावर; नवरी आहे प्रेग्नंट!

वृत्तसंस्था
रविवार, 1 मार्च 2020

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या ५५ वर्षीय जॉन्सन यांचा दोन वेळा विवाह झाला आहे.

लंडन : पंतप्रधानपदी असताना साखरपुडा झालेले बोरीस जॉन्सन हे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. जॉन्सन यांचा त्यांची प्रेयसी कॅरी सायमंडस यांच्याशी मागील वर्षाच्या अखेरीस वाङनिश्चय झाला असल्याचे या दांपत्यांच्या वकिलांनी शनिवारी (ता.२९) जाहीर केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सायमंडस या गरोदर असून, बाळाच्या जन्मापूर्वी हे दांपत्य विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त ब्रिटिश माध्यमांनी दिले आहे. ब्रिटनच्या २५० वर्षांच्या इतिहासात पंतप्रधानपदी असताना बोहल्यावर चढणारे जॉन्सन हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. 

Image may contain: 2 people, people standing

- Video : आता 'जेम्स बाँड'ही बोलू लागला मराठी; पाहा भन्नाट ट्रेलर!

जॉन्सन आणि कॅरी यांचा मागील वर्षांच्या अखेरीस वाङनिश्चय झाल्याच्या वृत्ताला पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘१० डाउनिंग स्ट्रीट’च्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. सायमंडस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही याबाबतची माहिती दिली असल्याचे वृत्तात म्हटले आहे. 

Image may contain: 1 person, text

- अमेरिकेचा तालिबानशी काय झाला ऐतिहासिक करार

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या ५५ वर्षीय जॉन्सन यांचा दोन वेळा विवाह झाला आहे. २६ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर जॉन्सन यांनी २०१८ मध्ये पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर मागील वर्षीपासून त्यांचे ३१ वर्षीय सायमंडस यांच्याशी प्रेमसंबंध जुळले होते.

Image may contain: one or more people and people standing

(बोरीस जॉन्सन आणि त्यांची दुसरी पत्नी मारिना व्हिलर)

- ट्रम्प भाषण देताना नेहमी अडखळतात; नेमकं काय आहे कारण?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boris Johnson and Carrie Symonds engaged and expecting a baby in early summer