8 बायका फजिती ऐका! बायकांची डिमांड ऐकून नवऱ्याला फुटला घाम, वाचा काय प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

global news

8 बायका फजिती ऐका! बायकांची डिमांड ऐकून नवऱ्याला फुटला घाम, वाचा काय प्रकरण

नऊ बायकांशी लग्न करणारा तरुण पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सुरवातीला लग्नाचे गोडवे गाणारा आता मात्र त्याच्या बायकांपासून त्रासलाय. हो, ब्राझीलमध्ये राहणाऱ्या आर्थरने  9 महिलांसोबत एकाच वेळी लग्न केलं होतं आणि त्यावेळी तो खूप चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्या एका पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. आता आर्थर आठ बायकांसोबत राहतो.

हेही वाचा: Viral Video: सापासोबत झोपलेली चिमुरडी, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सध्या आर्थर अडचणीत फसलाय. 'आठ बायका आणि फजिती ऐका' अशी त्याची गम्मत झाली. कारण आर्थरच्या बायकांनी त्याच्याजवळ एक आगळी वेगळी डिमांड केली आहे. जी डिमांड पूर्ण करताना त्याच्या नाकी नऊ येतात. तुम्हीही ही डिमांड ऐकाल तर थक्क व्हाल.

त्याच्या पत्नींच्या मते, त्याची फीट आणि सीक्स पॅक बॉडी असावी. त्यांची ही डिमांड पुर्ण करण्यासाठी तो जीम मध्ये तासन् तास घाम गाळतो. कठिण एक्सरसाइझ करतो यात मग मॅरेथॉन, क्रॉस फिट, वेट ट्रेनिंग रनिंग करतो. याशिवाय डाएटही काटेकोरपणे पाळतो. एवढंच काय तर ब्रेड, पास्ता सारख्या गोष्टीही तो इच्छा नसताना खात नाही.

हेही वाचा: Viral Ad: चक्क गर्लफ्रेंड होण्याचे मिळतील महिन्याला दोन लाख रुपये!

आर्थर नेहमी सोशल मीडियावर आपल्या बायकांसोबत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. रोजच्या अपडेट्स टाकत असतो. नेटकरी त्याच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात.

Web Title: Brazil Man Going To Gym For Completing Demand Of His 8 Wives To Make Six Pack Abs Body Read Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..