ब्रिटन, जर्मनीलाही निर्णय अमान्य

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

बर्लिन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या प्रवेशबंदी बाबतच्या निर्णयावर जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी जोरदार टीका केली आहे. "दहशतवाद्यांविरोधात लढाई करताना एखाद्या धर्मावर सरसकट संशय व्यक्त करणे अत्यंत चुकीचे आहे,' असे मर्केल यांनी म्हटले आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही ट्रम्प यांच्या या निर्णयाशी सहमत नसल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनच्या नागरिकांना त्रास झाल्यास हस्तक्षेप करण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला आहे. मे यांनी काल याबाबत मत व्यक्त करण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांच्याच एका मंत्र्याला, त्यांचा जन्म इराकमध्ये झाला असल्याने, अमेरिकेत प्रवेश मिळणार नसल्याचे समजल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. इतर खासदारांनीही मे यांच्या तटस्थपणावर टीका केली होती. त्यानंतर मे यांनी आपली भूमिका कठोर केली आहे.

ट्रम्प यांचा निर्णय म्हणजे "मूलतत्त्ववाद्यांसाठी मोठी भेट' असल्याची खोचक टीका इराणचे अर्थमंत्री महंमद जावेद झरीफ यांनी केली आहे. अमेरिकेने बंदी घातलेल्या देशांमध्ये इराणचाही समावेश आहे. "सर्व मुस्लिमांवर बंदी घालण्याच्या या निर्णयामुळे दहशतवादाला प्रोत्साहन मिळून दहशतवादी संघटनांकडे युवकांचा ओढा वाढेल,' असे झरीफ यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे इराणने पूर्वीच स्पष्ट केले आहे.

Web Title: britain, germany disapprove of trump's decision