Coronavirus : आता आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
बुधवार, 11 मार्च 2020

ब्रिटनमधील पहिल्या नेत्या

नदीन डॉरीस या कोरोनाची लागण झालेल्या ब्रिटनमधील पहिल्या राजकीय नेत्या आहेत. डॉरीस यांनी कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे त्या माध्यमातून इतरांनाही कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

लंडन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या 3 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यानंतर आता या व्हायरसची लागण आरोग्यमंत्र्यांनाच झाली आहे. या आरोग्यमंत्र्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आता त्यांची ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरात जवळपास शंभर देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. या सर्वच देशांमधील सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पावले उचलत आहेत. असे असताना खासदार आणि आरोग्यमंत्री नदीन डॉरीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती डॉरीस यांनी एक पत्रक जारी करून दिली आहे. यामध्ये डॉरीस यांनी सांगितले, की माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी घरात कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर राहते. 

Nadine Dorries

ब्रिटनमधील पहिल्या नेत्या

नदीन डॉरीस या कोरोनाची लागण झालेल्या ब्रिटनमधील पहिल्या राजकीय नेत्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी डॉरीस यांनी गेल्या काही दिवसांत अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून इतरांनाही कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Britain Health minister Nadine Dorries Coronavirus tests positive