घरांच्या बाजारपेठेला ब्रिटनमध्ये "घरघर'

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

ब्रेक्‍झिटनंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचीही घसरण सुरू आहे. यामुळे विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होऊन ते कमी होत आहे. अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याने घरांची मागणीही कमी झाली आहे

लंडन - ब्रिटनमध्ये घरांच्या किमतीतील वाढ दिवसेंदिवस कमी होत असून, ऑगस्टमध्ये ती मागील तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आली.
ब्रिटनने गेल्या वर्षी युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा म्हणजेच "ब्रेक्‍झिट'चा निर्णय घेतला. तेव्हापासून देशातील घरांच्या बाजारपेठेत मंदी आहे. या मंदीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने घरांच्या बाजारपेठेबाबत सर्वेक्षण केले. यात गेल्या वर्षी ऑगस्टच्या तुलनेत यंदा ऑगस्टमध्ये घरांच्या किमती केवळ 2.1 टक्के वाढल्या आहेत. हा मागील तीन महिन्यांतील नीचांक आहे, असे गृहकर्ज पुरवठादार संस्थांनी म्हटले आहे जुलैमध्ये घरांच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत 2.9 टक्के वाढल्या होत्या. घरांच्या किमतीतील वाढ मे महिन्यात 2.9 टक्के होती आणि मागील चार वर्षांमधील मे महिन्यातील ही नीचांकी पातळी होता.

ब्रेक्‍झिटनंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचीही घसरण सुरू आहे. यामुळे विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होऊन ते कमी होत आहे. अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याने घरांची मागणीही कमी झाली आहे. चलनावढ आणखी होण्याची शक्‍यता असल्याने घरांच्या किमती आणखी घसरतील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

Web Title: Britain houses brexit