ब्रेक्झिट : 'EU'मधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा पुनरुच्चार

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

लंडन : युरोपीय महासंघाच्या एकमेव बाजारपेठेत ब्रिटन राहण्याची शक्‍यता नाही, असे सांगत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी काळातील ब्रिटन आणि महासंघामधील व्यापारी संबंधांची दिशा स्पष्ट केली. तसेच, महासंघातून बाहेर पडणार असलो तरी संबंध संपलेले नाहीत, असेही त्यांनी ब्रिटिश अधिकारी आणि इतर देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात सांगितले.

युरोपीय महासंघाचे चार दशके सदस्य राहिल्यानंतर या संघातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी जाहीर केला. महासंघाबरोबर समान पातळीवर संबंध निर्माण करण्याची ब्रिटनची इच्छा असून, महासंघाचे तात्पुरते सदस्यत्व अथवा इतर मार्गांनी निर्माण होणारे अर्धवट संबंध नकोत, असे मे यांनी स्पष्ट केले. 'ब्रेक्‍झिट'मुळे ब्रिटन कमजोर होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, ब्रिटनला अधिक शक्तिशाली, अधिक एकसंध आणि उर्वरित जगाकडे अधिक मोकळेपणाने पाहणारा देश म्हणून पुढे आणण्याचे आपले प्रयत्न असल्याचे मे यांनी आजच्या भाषणात सांगितले.

स्थलांतरितांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी युरोपीय महासंघाची एकमेव बाजारपेठ सोडण्याचे प्रमुख कारण असल्याचे मे यांच्या भाषणातून सूचित करण्यात आले.

Web Title: britain reiterates to leave eu completely