ब्रिटिश एअरवेजला 'डेटा चोरी'चा फटका ; क्रेडिट कार्डांची माहिती 'हॅक' 

British Airways data stealing Credit Card Info Hack
British Airways data stealing Credit Card Info Hack

लंडन : ब्रिटिश एअरवेज या विमान कंपनीच्या सुमारे तीन लाख 80 हजार ग्राहकांच्या क्रेडिट कार्डशी संबंधित माहितीची (डेटा) चोरी झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे कंपनीकडून आज सांगण्यात आले. कंपनीचे संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपवरून तिकिटे खरेदी केलेल्या ग्राहकांची माहिती हॅक करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डांशी संबंधित माहितीची मोठ्या प्रमाणात चोरी झाली असून, त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांचा धोका निर्माण झाला असल्याचेही कंपनीने मान्य केले आहे. 

ब्रिटिश एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्‍स क्रूझ यांनी सांगितले, की कंपनीच्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डांशी संबंधित माहितीची चोरी झाली असून, त्या माहितीचा आर्थिक गैरव्यवहारांसाठी वापर केला जाऊ शकतो, अशी शक्‍यता आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. कंपनीच्या यंत्रणेवर झालेला हा अतिशय गंभीर सायबर हल्ला आहे. 
या घटनेमुळे होणाऱ्या नुकसानीला कंपनी जबाबदार असेल, असेही ब्रिटिश एअरवेजकडून सांगण्यात आले.

पारपत्रांशी (पासपोर्ट) संबंधित माहितीची चोरी झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, आपल्या क्रेडिट कार्डशी संबंधित माहितीचा दुरुपयोग करून आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार यापूर्वीच काही संतप्त ग्राहकांनी ब्रिटनच्या प्रेस असोसिएशनकडे केली आहे. 

कुठल्या माहितीची झाली चोरी ? 

कंपनीच्या ग्राहकांची नावे, पत्ते, ई-मेल, क्रेडिट कार्डांची माहिती, कार्डांचे क्रमांक, कार्डांची मुदत आणि क्रेडिट कार्डांच्या मागे असलेला तीन आकडी क्रमांक आदींची माहिती हॅकर्सनी चोरली आहे. "डेटा चोरी'ची शिकार झालेल्या सर्व ग्राहकांशी गुरुवारी रात्री संपर्क साधण्यात आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

कधी झाली चोरी? 
21 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com