जगातील 7 सर्वोत्तम पार्लमेंट; सौंदर्य पाहून व्हाल थक्क

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 10 December 2020

भारताच्या नव्या संसदेच्या उभारणीचे काम 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

भारताच्या नव्या संसदेच्या उभारणीचे काम 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. असे असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन कार्यक्रमाला कोणती हरकत नसल्याचं म्हटलं आहे. देशाची नवी संसद उभा करण्यासाठी वास्तुविशारदांनी इतर देशांच्या संसदेची पाहणी केली आहे. जगभरातील काही देशांच्या संसद पाहण्यासाठी आकर्षक तर आहेतच पण त्यासोबत कामाच्या दृष्टीनेही अनेक अद्ययावत सुविधांनी सज्ज अशा वास्तू आहेत. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांच्या संसदेपासून ते बांगलादेशच्या संसदेचाही यामध्ये समावेश आहे.

ब्रिटन

ब्रिटनमधील पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर जगातील सर्वच संसदेचं मूळ मानलं जातं. चार्ल्स बेरी आणि अगस्तस वेल्बि पुगिन यांनी या संसदेचं डिझाइन केलं होतं. थेम्स नदीच्या काठावर उभारण्यात आलेली ही संसद जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. या संसदेच्या आवारत तीन टॉवर आहेत. एलिझाबेथ टॉवर, न्यू पॅलेस आणि हाउस ऑफ कॉमन्स अशी या तीन टॉवरची नावे आहेत. गॉथिक स्थापत्य शैलीचा अद्भुत असा नमुना म्हणून याकडे पाहिलं जातं. इतिहास आणि स्थापत्य शैलीमुळे 1987 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या संसदेचा समावेश केला. 

इसी 10 दिसंबर को देश में नए संसद भवन की नींव रखी जा रही है. इसे वास्तु के अलावा हर लिहाज से बेहतरीन बनाने की कोशिश है. इसके लिए वास्तुविदों ने कई देशों की संसद का निरीक्षण किया और प्रेरणा ली. वैसे दुनिया में कई पार्लियामेंट हाउस हैं जो दिखने में भी बेहद आकर्षक हैं और साथ ही साथ सुविधायुक्त भी हैं. इनमें उस देश की संसद भी शामिल है, जिसने लगभग सारी दुनिया पर राज किया, यानी ब्रिटिश संसद. सांकेतिक फोटो (Pixabay)

आता महिलांना मिळणार अधिक 'शक्ती', मंत्रिमंडळ बैठकीत शक्ती कायद्याला...

श्रीलंका

भारताचा शेजारी देश श्रीलंकेची संसदही जगातील सुंदर अशा पार्लमेंट हाऊसपैकी एक आहे. इतर संसद भवनांच्या तुलनेत लंकेच्या संसदेची उभारणी खूप कमी वेळेत झाली. 1979 ते 1982 या चार वर्षांच्या कालावधीत या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जोफ्री बावा नावाच्या लंकेच्या वास्तुविशारदाने याचा आराखडा तयार केला होता. यामध्ये श्रीलंकेतील बौद्ध इमारतींशिवाय इतर आधुनिक स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो. संसद भवनाचे सरव दरवाचे चांदीसारखे चमकदार आहेत. तर भवनाच्या आतील सजावट ही ब्रिटीश संसदेसारखी आहे. तळ्याच्या काठावर असल्याने संसदेच्या सौदर्यात आणखी भर पडते.

श्रीलंका का संसद भवन भी दुनिया के बेहतरीन पार्लियामेंट हाउसेज में गिना जाता है. दूसरे संसद भवनों की अपेक्षा इसके निर्माण में केवल चार ही साल लगे और साल 1979 से लेकर 1982 के बीच ये बनकर पूरा हो गया. जोफ्री बावा नाम के श्रीलंकन वास्तुविद ने इसका नक्शा बनाया. इसमें श्रीलंकन बौद्ध इमारतों के अलावा काफी मॉर्डन छाप भी है. संसद भवन में सारे दरवाजे चांदी से चमकीले हैं. भवन की आंतरिक बनावट ब्रिटिश संसद की तरह है. लेकिन इस संसद की सबसे बड़ी खासियत ये है कि यह एक झील के पास बनी है, जहां से लगातार प्रकृति का नजारा दिखता है.

बांगलादेश

जगभरातील सुंदर अशा संसद भवनांमध्ये आशियाई देशांमधील संसद भवनांचा समावेश आहे. यात बांगलादेशची संसदही तितकीच सुंदर अशी आहे. ढाक्यात असलेलं पार्लमेंट हाउस हे एका कृत्रिम तलावाच्या काठावर उभारण्यात आलं आहे. 1961 मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. दहा वर्षे बांधकामासाठी लागलेल्या या संसदेच्या आत 8 इमारती एकमेकींना जोडून आहेत. अमेरिकन वंशाचा वास्तुविशारद लुइस कन्हने याचा आराखडा तयार केला होता. अशा प्रकारच्या इमारतीची प्रेरणा त्याला स्कॉटलंडच्या किल्ल्यावरून सुचली होती.

दिलचस्प बात है कि एशियाई देशों की संसद खूबसूरती के लिहाज से काफी ऊपर रखी जाती रही हैं. इनमें से एक नाम बांग्लादेश की संसद का भी है. ढाका में बना ये पार्लियामेंट हाउस एक आर्टिफिशियल झील के किनारे बनाया गया. साल 1961 से इसका निर्माण शुरू हुआ तो बनने में 10 साल लगे. बाहर से दिखने में ये एक इमारत लगती है लेकिन भीतर 8 इमारतें आपस में जुड़ी हुई हैं. एस्टोनियन अमेरिकी मूल के वास्तुविद लुइस कह्न ने इसका नक्शा तैयार किया, जो मूलतः स्कॉटलैंड के किलों से प्रेरित है.

रोमानिया

जगातील सर्वात मोठ्या आणि भक्कम अशा संसद भवनांमध्ये रोमानियाच्या संसदेचा समावेश आहे. 1984 ते 1997 दरम्यान या संसद भवनाचे बांधकाम करण्यात आले. बुखारेस्टमध्ये तयार करण्यात आलेली ही इमारत वास्तुविशारद एन्का पेट्रिशियाने तयार केलेल्या आराखड्यानुसार बांधण्यात आली आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने हे डिझाइन तयार केल होतं हे विशेष. हे संसद भवन तयार करण्यासाठी 20 हजार सैनिक आणि कैद्यांनी दिवस रात्र काम केलं होतं. याच्या आतील भाग हा संगमरवरी दगडात बांधण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने 8 गुप्त मार्गही आहेत. 

यूरोपियन देश रोमानिया में संसद भवन के लिए साल 1984-97 तक निर्माण चला. ये दुनिया के सबसे बड़े और मजबूत पार्लियामेंट भवनों में से है. बुखारेस्ट में बनी ये इमारत वास्तुकार एन्का पेट्रिशिया के दिमाग की उपज है. जब उन्होंने तानाशाह Nicolae Ceausescu के कहने पर इमारत का नक्शा तैयार करना शुरू किया, तब वे महज 32 साल की थीं. ये अपने-आप में रिकॉर्ड है क्योंकि आमतौर पर संसद भवन का नक्शा बनाने वाले लोग काफी उम्रदराज रहे. भवन बनाने के लिए 20000 सैनिकों और कैदियों ने दिन-रात काम किया, तब जाकर यहां की भव्य इमारत बन सकी. इसका भीतर का हिस्सा संगमरमर से बना है. साथ ही यहां 8 खुफिया सुरंगें भी हैं ताकि आपात स्थिति में सांसद निकल सकें.

Love Story : सोनिया गांधींना पहिल्या नजरेत राजीव यांच्यावर झालं होतं प्रेम

स्कॉटलंड

अलिकडच्या काळात बांधण्यात आलेली स्कॉटलंडच्या संसद भवनाची इमारतही सुंदर अशी आहे. 1999 ते 2004 या कालावधीत बांधण्यात आलेली ही संसद वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या इमारतीच्या उभारणीसाठी प्रचंड पैसे खर्च करण्यात आले होते. अनेक इमारतींचा समावेश असलेल्या या संसदेचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व इमारती या वेगवेगळ्या आहेत. बाहेर आणि आत इतक्या वेगवेगळ्या आहेत की एकाच देशाची संसद आहे असंही वाटणार नाही. वास्तुविशारद एनरिक मिरालस यांनी याचा आराखडा तयार केला होता. आराखडा तयार होताच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आराखड्यात कोणताही बदल न करता त्याप्रमाणेच संसदेचं बांधकाम करण्यात आलं होतं. 

स्कॉटलैंड का संसद भवन भी बेहद खूबसूरत है. साल 1999-2004 के बीच बना ये भवन काफी विवादित भी रहा क्योंकि इसपर खुलकर पैसे खर्च हुए. कई इमारतों से बने इस भवन की खासियत है कि सारे भवन एक-दूसरे से एकदम ही अलग हैं. ये बाहर और भीतर से इतने अलग हैं कि इन्हें एक कैंपस से हटाने पर एक देश का भी नहीं सोचा जा सकता. वास्तुविद एनरिक मिरालस ने इसका नक्शा बनाया था लेकिन नक्शा तैयार होने के साथ ही उनकी मौत हो गई. हालांकि नक्शे में बिना फेरबदल उसे वैसे का वैसा उकेर दिया गया.

जर्मनी

जगातील अनोख्या आणि आकर्षक अशा संसदेच्या इमारतींमध्ये जर्मनीच्या संसदेचं नावही आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये संसदेचं भवन असून 1884 ते 1894 दरम्यान या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं होतं. हिटलरच्या काळानंतर यामध्ये अनेक बदल झाले. 90 च्या दशकात इंग्लिश वास्तुविशारद नॉर्मन फॉस्टरने यामध्ये अनेक बदल केले. 

खूबसूरत इमारतों का जिक्र हो और जर्मनी की संसद का नाम न आए, ऐसा भला कहां हो सकता है. जर्मनी की राजधानी बर्लिन में ये संसद भवन है, जिसका निर्माण साल 1884-1894 के बीच हुआ. हालांकि इसमें हिटलर के दौर से आगे काफी बदलाव हुए. नब्बे के दशक में अंग्रेज वास्तुविद नॉर्मन फॉस्टर ने इसमें कई बदलाव किए.

फिनलँड

रशियाच्या ताब्यातून स्वतंत्र झालेल्या फिनलँडची संसद त्यांच्या देशाची ताकद इमारतीमधून दाखवून देते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फिनलँडने अर्थव्यवस्थेमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. हेलसिंकीमध्ये असलेली ही संसद गुलाबी आणि फिकट पांढऱ्या रंगाची आहे. ग्रेनाइट दगडांपासून बांधण्यात आलेल्या इमारतीच्या आतही रंगांचा छान असा वापर करण्यात आला आहे. जगात पहिल्यांदा 1907 मध्ये पहिल्या महिला MP ने मत दिलं होतं. ती जागाही सुरक्षित अशी ठेवण्यात आली आहे.

फिनलैंड का पार्लियामेंट हाउस इस देश की मजबूती को दिखाता है. साल 1917 में ही ये देश रूस से आजाद हुआ और इसके साथ ही इसने अर्थव्यवस्था में खुद को स्थापित करना शुरू कर दिया. हेलसिंकी में बना यहां का संसद भवन भी देश की मजबूती से मिलता-जुलता है. ये गुलाबी और धूसर सफेद रंग की ठोस इमारत है, जो ग्रेनाइट पत्थरों से बनी है. हालांकि इमारत के भीतर रंगों का काफी शानदार प्रयोग है. भीतर वो जगह भी है, जहां साल 1907 में दुनिया की पहली महिला MPs ने वोट किया था. यहां पर एक नग्न मूर्ति है, जो फिनिश मजबूती को दिखाती है.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bset parliament houses in world amid india new parliament building