मानवाला चंद्रावर पाठविणारे शक्तिशाली रॉकेट तयार

फ्लोरिडातील केनेडी अवकाश केंद्रातील अभियंत्यांनी रॉकेटच्या ६५ मीटर उंचीच्या मुख्य भागांचे दोन लहान बूस्टर रॉकेटमध्ये बसविले आहेत.
SLS Rocket
SLS RocketSakal

वॉशिंग्टन - दुसऱ्या मानवी चांद्र मोहिमेच्या (Lunar Mission) दिशेने ‘नासा’ने (Nasa) एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘अर्टिमिस’ या अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे मानव पुन्हा चंद्रावर (Moon) उतरणार असून अंतराळवीरांच्या चांद्र प्रवासासाठी आतापर्यंतचे सर्वांत शक्तीशाली ‘स्पेस लाँच सिस्टिम’ (एसएलएस) (SLS) हे रॉकेट (Rocket) तयार झाले आहे. (Build a Powerful Rocket to Send Humans to the Moon)

फ्लोरिडातील केनेडी अवकाश केंद्रातील अभियंत्यांनी रॉकेटच्या ६५ मीटर उंचीच्या मुख्य भागांचे दोन लहान बूस्टर रॉकेटमध्ये बसविले आहेत. या विशाल रॉकेटचे तीन भाग सोमवारी (ता.१४) मोबाईल लाँच पॅडवर स्थापित करण्यात आले. ‘नासा’ यंदा ‘एसएलएस’चे पहिले उड्डाण करणार आहे. या मोहिमेला ‘अर्टिमिस-१’ असे नाव दिले आहे. या मोहिमेत ‘एसएलएस’द्वारे अमेरिकेचे अत्याधुनिक अवकाशयान ओरियन हे चंद्राच्या दिशेने पाठविण्यात येणार आहे. पहिल्या उड्डाणात अंतराळवीरांना पाठविण्यात येणार नाही. मानवी चांद्र मोहीम २०२३मध्ये प्रत्यक्षात येणार असून त्याआधी रॉकेट व अंतराळयानाच्या यशस्वी चाचण्या अभियंते घेणार आहेत. अपोलो-१७ हे यान १९७२ मध्ये चंद्रावर उतरले होते. त्यानंतर आता ‘अर्टिमिस-३’ मोहिमेतून मानव चंद्रावर स्वारी करण्यास पुन्हा सज्ज झाला आहे.

SLS Rocket
कोरोनाकाळात अमेरिकेत होतोय वंशभेद; लसीकरणातील भेदभाव चव्हाट्यावर

चार शक्तिशाली इंजिन

‘एसएलएस’ या रॉकेटच्या अतिविशाल गाभ्यात चार शक्तिशाली प्रोपेलंट इंजिन आहेत. याच्या दोन्ही बाजूने ५४ मीटर लांबीचे शक्तीशाली रॉकेट बूस्टर आहेत. उड्डाणाच्या पहिल्या दोन मिनिटांच्या काळात या दोन्ही बूस्टरमधूनच ‘एसएलएस’ला जमिनीवरून वर ढकलण्यास ऊर्जा मिळणार आहे. या रॉकेटचा गाभा भाग आणि दोन्ही रॉकेट बूस्टर हे अमेरिकेच्या स्वांतत्र्यदेवीच्या पुतळ्यापेक्षा (चबुतराविना) उंच आहेत.

वजनदार ‘एसएलएस’

८५,२७६.८ (किलो) वजन

२१२ फूट उंची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com