सुनामीनंतर इंडोनेशियात दफनविधीचे आव्हान 

पीटीआय
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

पालू (इंडोनेशिया) (पीटीआय) : भूकंप आणि सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या देशाने आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे. सुनामीच्या तडाख्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सुमारे एक हजारहून अधिक नागरिकांच्या दफनविधीचे आव्हान स्वयंसेवकांसमोर आहे. सुनामीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या पालू शहराजवळील पोबोया येथे सुमारे शंभर मीटर लांबीचा खड्डा खोदण्यात आला असून, त्यात सर्व मृतदेहांचे सामूहिक दफन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सुमारे एक हजार 300 मृतदेहांच्या दफनाची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

अद्यापही अनेक ठिकाणी मदत पथके पोचलेली नसून, अनेक दुर्गम भागात पोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सुनामीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. सरकारी आकडेवारीनुसार सुनामीच्या संकटात बळी गेलेल्यांची संख्या 832 असली, तरी ती वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून त्यांच्या दफनविधीची तयारी केली जात आहे. 

दरम्यान, या संकटाचा मुकाबला करण्याची आमची क्षमता असल्याचा सुरवातीला दावा करणाऱ्या इंडोनेशियाच्या प्रशासनाकडून आता मदतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था आणि संघटनांना आवाहन करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burial challenge in Indonesia after the Tsunami