तब्बल तीस लाखाला खरेदी केले डायनॉसॉरचे सापळे!

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पॅरीस (फ्रान्स) : पॅरीसमध्ये बुधवारी लिलावात एका विदेशी खरेदीदाराने तब्बल तीस लाखांना दोन डायनॉसॉरचे सापळे विकत घेतले आहेत. 'डिप्लोडोकस' व 'अॅलोसॉरस' अशा दोन प्रकारच्या डायनॉसॉरचे सापळे हे हिप डिझाईन ऑब्जेक्ट म्हणून ठेवले होते.

Dinosaur

इतकी मोठी किंमत यापूर्वी कधीच आली नव्हती, असे ड्रॉआऊट लिलावच्या आयोजकांनी सांगितले. 'डिप्लोडोकस'चा सापळा 12 मीटर लांबीचा आहे, तर 'अॅलोसॉरस'चा सापळा हा 12.5 मीटर इतका लांब आहे. 

हे दोन्ही डायनॉसॉर 15 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर ज्युरासीक काळात फिरत असल्याची माहिती यावेळी लिलावात देण्यात आली. युरोपमध्ये वर्षातून एकदाच केवळ पाच डायनॉसॉरचे सापळे लिलावात ठेवण्यात येतात. 

डायनॉसॉरचे सापळे विकत घेणे ही सध्या प्रतिष्ठेची बाब बनली आहे. महागडी चित्र, दुर्मिळ वस्तूंप्रमाणे डायनॉसॉरचे सापळे आपल्या संग्रहात आवर्जून लोक ठेवतात. 

Web Title: Buyer Pays Over $3 Million For 2 Dinosaur Skeletons