केंब्रिज अॅनालिटीका कंपनीला टाळे

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

बुधवारी (ता. 2) केंब्रिज अॅनालिटीकाने अमेरिका व ब्रिटनमध्ये कामकाज बंद करून स्वतःला दिवाळखोर जाहिर केले आहे. यापुढे या प्रकारच्या कोणत्याही व्यवसायात ते राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन : गेले काही दिवस चर्चेत असलेली, फेसबुकवरील डेटाचोरी प्रकरणी अडचणीत आलेली राजकीय विश्लेषक संस्था केंब्रिज अॅनालिटीकाने आपले सर्व कामकाज बंद केल्याची घोषणा केली आहे. फेसबुकवरील युजर्सची माहिती चोरून तिचा गैरवापर केल्याचा केंब्रिज अॅनालिटीका व फेसबुकवर आरोप होता. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करताना ही माहिती केंब्रिज अॅनालिटीकाने चोरली असे समोर आले होते.

cambridge analytica

या सर्व प्रकारानंतर बुधवारी (ता. 2) केंब्रिज अॅनालिटीकाने अमेरिका व ब्रिटनमध्ये कामकाज बंद करून स्वतःला दिवाळखोर जाहिर केले आहे. यापुढे या प्रकारच्या कोणत्याही व्यवसायात ते राहणार नाही असेही त्यांनी सांगितले. 2013 मध्ये ही राजकीय विश्लेषक कंपनी चालू झाली होती. 2016 च्या अमेरीकेच्या निवडणूकीसाठी काम करताना फेसबुकवरून या कंपनीने लोकांची वैयक्तिक माहिती चोरून तिचा गैरवापर केल्याचा आरोप होता. 

केंब्रिज अॅनालिटीका ही मोठ्या प्रमाणावर डेटा पुरवण्याचे काम करते. या कंपनीचे संस्थापक क्रिस्टोफर वाइली यांनी फेसबुकवरून 5 कोटी लोकांची माहिती चोरीला जात असल्याची बाब समोर आणली होती. या घटनेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

यात फेसबुकही सहभागी असल्याने त्यांच्यावरही मोठी टिका करण्यात आली होती. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली व दिलगिरी व्यक्त केली. व यापुढे फेसबुकच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष दिले जाईल, असे आश्वासनही दिले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cambridge Analytica company get shutting down