
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मार्क कार्नी यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. कॅनडाच्या सरकारी वाहिनी सीबीसी आणि सीटीव्ही न्यूजने ही माहिती दिली आहे. या निवडणुकीत लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सरकार स्थापन केले आहे, जे कॅनडाच्या राजकीय इतिहासातील एक मोठे यश मानले जात आहे. यावेळी लिबरल पक्षाचे नेतृत्व माजी बँकर मार्क कार्नी यांनी केले, ज्यांना प्रचंड विजय मिळाला.