प्रवेश नाकारलेल्यांना कॅनडा करणार मदत

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

कॅनडातील उदारमतवादी सरकारचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडू यांनी आत्तापर्यंत ट्रम्प यांच्यावर टीका करणे टाळले आहे. मात्र, आता कॅनडाने पहिल्यांदाच ट्रम्पविरोधी भूमिका घेतली आ

टोरॉंटो - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत तात्पुरती प्रवेशबंदी केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या नागरिकांना कॅनडाने मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेकडून प्रवेश नाकारण्यात आलेल्या कुठल्याही प्रवाशाला कॅनडाचे तात्पुकते नागरिकत्व देण्यात येईल, अशी घोषणा कॅनडाचे मंत्री अहमद हुसेन यांनी काल (ता. 29) केली.

कॅनडातून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात प्रवेश नाकारण्यात आलेल्या नागरिकांची संख्या तुलनेने अल्प असल्याचे हुसेन यांनी सांगितले. मात्र, अमेरिकेकडून प्रवेश नाकारण्यात आलेल्या कुठल्याही प्रवाशाला कॅनडाचे तात्पुरते नागरिकत्व देण्यात येईल, असे हुसेन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

कॅनडातील उदारमतवादी सरकारचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडू यांनी आत्तापर्यंत ट्रम्प यांच्यावर टीका करणे टाळले आहे. मात्र, आता कॅनडाने पहिल्यांदाच ट्रम्पविरोधी भूमिका घेतली आहे. कॅनडातील विरोधी पक्षानेही याप्रकरणी संसदेत विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी करत ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध दर्शविला आहे.
 

Web Title: Canada to offer temporary residency to travelers stranded by U.S