esakal | कॅनडामध्ये भारतीय विमानांना 21 ऑगस्टपर्यंत नो एन्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

flight

कॅनडाने त्यांच्या नागरिकांना आवाहन केलं आहे की, पुढची नोटीस येईपर्यंत लोकांनी कोरोनाचा धोका पाहता परदेशात प्रवास करणं टाळावं.

कॅनडामध्ये भारतीय विमानांना 21 ऑगस्टपर्यंत नो एन्ट्री

sakal_logo
By
सूरज यादव

कोरोना व्हायरसचा धोका अद्याप कमी झालेला नाही. ऑस्ट्रेलियात पुन्हा काही ठिकाणी निर्बंध लागू केले आहेत. आता कॅनडा सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांना 21 ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. कॅनडाने त्यांच्या नागरिकांना आवाहन केलं आहे की, पुढची नोटीस येईपर्यंत लोकांनी कोरोनाचा धोका पाहता परदेशात प्रवास करणं टाळावं.

भारतात जाण्यासाठी इतर देशांमधून प्रवास करत असतील त्यांना कोरोना व्हायरस मोलेक्युलर टेस्ट करावी लागेल. यामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला तरच कॅनडामध्ये प्रवेश मिळेल. जर आधीच एखाद्याला कोरोना होऊन गेला असेल तर त्यांना प्रवासाच्या आधी 14 ते 90 दिवस अगोदर टेस्ट करावी लागेल. ही टेस्टसुद्धा भारत आणि कॅनडाशिवाय दुसऱ्या देशात करावी लागेल असंही नोटीसीत म्हटलं आहे.

हेही वाचा: पेगॅसस प्रकरणी संयुक्त राष्ट्राची एन्ट्री; सरकारला सुनावलं

याआधी कॅनडाने कोरोनाचा नवा व्हेरिअंट पसरल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधून थेट उड्डाण करणाऱ्या विमानांना बंदी घातली होती. आता हे निर्बंध वाढवले जात आहेत. अत्यावश्यक साहित्य ज्यात लस, सुरक्षेचं साहित्य यांच्या वाहतुकीसाठी मालवाहू विमानांना परवानगी देण्यात आली आहे.

loading image