काबूलमध्ये स्फोट; सात ठार, दहा जखमी

पीटीआय
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- काबूलमध्ये झालेल्या बाँबस्फोटात सात जण ठार

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात सात जण ठार झाले. शहराच्या कसाबा भागामध्ये एका वाहनात झालेल्या बॉंबस्फोटात हे सात जण ठार झाले, तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अद्याप या बॉंबस्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ता नसरत रहिमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाजवळील मंत्रालयाच्या परिसरात स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वासातच्या सुमारास बाँबस्फोट करण्यात आला. या बॉंबस्फोटामुळे या परिसरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, बॉंबस्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. 

Video: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...

मृतांमध्ये एका तेरा वर्षीय मुलगा असून, चार परदेशी सुरक्षा संघटनांचे सदस्य असल्याची माहिती त्यांनी दिली. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला "गार्डावर्ल्ड' नावाच्या खासगी कॅनेडियन सुरक्षा कंपनीच्या वाहनाला लक्ष्य करीत केला होता, अशी माहितीही पोलिसांनी या वेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car bomb blast kills seven in Afghan capital Kabul