कार्बनचे प्रमाण धोकादायक पातळीवर

औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
Air Pollution
Air PollutionSakal

वॉशिंग्टन - औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत हवेतील (Air) कार्बन डाय ऑक्साइडचे (Carbon Dioxide) प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले (Increase) असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कार्बन वायूचे प्रमाण वाढण्याचा सरासरी वेग हा अधिक असल्याचेही दिसून आले आहे. (Carbon Levels at Dangerous Levels)

अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरशास्त्र आणि हवामान प्रशासन विभागाने या बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, हवेतील कार्बन डाय ऑक्साइड वायूची सरासरी पातळी दर दहा लाख कणांमागे ४१९.१३ इतकी आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यात १.८२ ने वाढ झाली आहे. औद्योगिकीकरण पूर्व काळात हवेतील कार्बन वायूचे प्रमाण दर दहा लाख कणांमागे २८० इतके होते. उन्हाळ्याच्या काळात मे महिन्यात हवेतील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण मोजले जाते.

Air Pollution
VIDEO: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूल मॅक्रॉन यांना लगावलं कानशीलात; व्हिडीओ व्हायरल

बहराचा हंगाम सुरु झाल्यावर झाडांकडून नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात कार्बन शोषला जातो. मात्र, मानवनिर्मित घडामोडींमुळे हवेत सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण त्या तुलनेत कितीतरी अधिक असल्याने प्रदूषणात आणि परिणामी जागतिक तापमानात वाढ होते आहे.

कार्बनचे प्रमाण आता औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढल्याने पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका दशकाची सरासरी वाढही २.४ इतकी आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून पर्यावरण बदलाचे घातक परिणाम आपल्याला टाळायचे असल्यास कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तातडीने काम करणे आवश्‍यक आहे, असे मत कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञ नताली मोहोवाल्ड यांनी सांगितले. पर्यावरण बदलामुळे वातावरणात मोठे बदल घडत असून चक्रीवादळांचे प्रमाण वाढणे, पूर येणे, दुष्काळ पडणे, समुद्राची पातळी वाढणे असे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Air Pollution
हे आणि काय? पाकिस्तानात चक्क सिक्योरिटी गार्डने केली महिलेची सर्जरी

कार्बन वाढीचा प्रचंड वेग

हवेतील कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढण्याचा वेग आश्‍चर्यकारकरित्या अधिक आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. उदाहरणार्थ, शीतयुगानंतर पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनचे प्रमाण दर दहा लाख कणांमागे ८० भाग इतक्या प्रमाणात वाढले. हे प्रमाण वाढण्यासाठी सहा हजार वर्षे लागली. मात्र, सध्या कार्बनचे प्रमाण याहून अधिक वेगाने वाढत असून ही वाढ काही दशकांमध्येच झाली आहे. तुलना करायची झाल्यास, १९७९ ते २०२१ या ४२ वर्षांच्या काळातच कार्बनचे प्रमाण ८० भागांनी वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com