ऐकावं ते नवलच! पायांचे फोटो विकून कमावते दिवसाला 60 हजार रुपये

ऐकावं ते नवलच! पायांचे फोटो विकून कमावते दिवसाला 60 हजार रुपये

नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि डिजीटल मार्केंटीगच्या या जमान्यामध्ये लोक नवनव्या पद्धतीचे मार्ग वापरुन पैसे कमावताना दिसून येतात. काही लोकं आपलं युट्युब चॅनेल काढतात, व्हिडीओ तयार करतात आणि त्या माध्यमातून कमावतात तर काहीजण ब्लॉगिंग करुन कमावतात. मात्र, तुम्ही कधी असा विचार केलाय का की कुणी स्वत:च्या पायांचे फोटो विकून प्रत्येक दिवशी हजारो रुपये कमावू शकतो? मात्र, हे प्रत्यक्षात घडलं आहे आणि एका मुलीने हे करुन दाखवलं आहे. ही मुलगी आपल्या पायाचे फोटो काढून त्याची विक्री करते आणि दररोज जवळपास 60 हजार रुपयांची कमाई करते. या मुलीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांची फॅन्स आर्मी देखील बनवली आहे.

ऐकावं ते नवलच! पायांचे फोटो विकून कमावते दिवसाला 60 हजार रुपये
दारूच्या नशेत 2 पुरुषांनी केलं लग्न! शुद्धीत आल्यावर...

टिकटॉकवर व्हायरल होतात व्हिडीओ

20 वर्षाच्या या मुलीने टिकटॉकवर खुलासा करत सांगितलंय की, ती कशापद्धतीने आपलं जीवन जगते. टिकटॉक युझर कॅट मामाचे 27,300 फॉलोअर्स आहेत. टिकटॉक युझर Cat Mama सोशल मीडियावर फेमस आहे कारण तिच्या चाहत्यांना तिचे पाय पाहणं फारच आवडतं. कॅट टिकटॉकवर आपल्या पायांचे फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करते.

प्रत्येक दिवशी कमावते 60 हजार

मिळालेल्या माहितीनुसार, कॅट मामा फक्त एका दिवसात 60 हजार रुपयांपर्यंतची कमाई करते. काही वेळी हा आकडा याहूनही अधिक किंमतीचा असतो. तिच्या पायांचे वैशिष्ट्य आहे की, कॅट आपल्या पायांना वेगवेगळ्या प्रकारचे नेल पॉलिश डिझाईन, नखांचे डिझाईन, दागिने, जोडव्या, पैंजण या माध्यमातून सजवते, त्यांचे फोटो काढते आणि ते पोस्ट करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com