सावधान, कोरोनाच्या बदलाचा वेग वाढतोय; संशोधकांचा दक्षतेचा इशारा

पीटीआय
Wednesday, 20 January 2021

जगाला कोरोना लसीकरणाने दिलासा मिळत आहे. मात्र, कोरोना विषाणुमध्ये वेगाने बदल होत (म्युटेशन) आहेत. लसीकरणाला जितका विलंब होईल, तितकी सध्याच्या चाचण्या, उपचार आणि लशीला चकमा देणाऱ्या नव्या प्रकारच्या विषाणुच्या उदयाची शक्यता अधिक असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दिला आहे.

वॉशिंग्टन - जगाला कोरोना लसीकरणाने दिलासा मिळत आहे. मात्र, कोरोना विषाणुमध्ये वेगाने बदल होत (म्युटेशन) आहेत. लसीकरणाला जितका विलंब होईल, तितकी सध्याच्या चाचण्या, उपचार आणि लशीला चकमा देणाऱ्या नव्या प्रकारच्या विषाणुच्या उदयाची शक्यता अधिक असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही नव्या विषाणूच्या निदानासाठी अधिक प्रयत्न घेण्याचे आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणू दिवसेंदिवस अनुवांशिकदृष्ट्या अधिक वैविध्यपूर्ण बनत आहे. त्यामागे नव्या रुग्णांचे वाढते प्रमाण हे एक प्रमुख कारण आहे. प्रत्येक नव्या संसर्गामुळे विषाणुला स्वत:मध्ये बदल घडवून स्वत:चे अनेक नमुने तयार करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे, कोरोनावरील आत्तापर्यंत मुश्कीलीने मिळविलला ताबा पुन्हा निसटून परिस्थिती मूळपदावर जाण्याची चिंताही संशोधकांना सतावत आहे.

'हिंसेचं समर्थन कदापि नाही'; मेलानिया ट्रम्प यांनी 'US फर्स्ट लेडी' म्हणून केलं शेवटचं भाषण

आत्तापर्यंत, कोरोनावर लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे संकेत आहेत. मात्र, विषाणूचा नवा प्रकार चाचण्यांना चकमा देऊन प्रतिजैवके व इतर उपचारांनाही दाद न देण्याचीही चिन्हे दिसत आहेत.

अमेरिकेतील प्रसिद्ध उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ डॉ.पॅरडिस साबेटी म्हणाले, की आपली स्पर्धा आता वेळेशी सुरू आहे. बदलाच्या प्रक्रियेत अडखळलेला विषाणू अधिक घातक ठरू शकतो. तरुणांना मास्क न घालणे आवडत नाही. तसेच, कोरोनाचा नवा प्रकारही त्यांना फारसा आजारी पाडू शकत नाही. मात्र, २०१४ मधील इबोला विषाणूच्या बदलाप्रमाणे कोरोनाचा एखादा प्रकार महागात पडू शकतो.  त्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष न करता सावधगिरी बाळगायला हवी. 

इम्रान खान यांच्यावर प्रचंड दबाव; 31 जानेवारीपर्यंत देणार राजीनामा?

अमेरिकेत मार्चपर्यंत नव्या विषाणुचे वर्चस्व?
कोरोनाच्या थैमानाने अमेरिका मेटाकुटीला आलेली असताना आता महासत्तेसमोर कोरोनाच्या नव्या प्रकाराचे संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेच्या साथ नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमध्ये पहिल्यांदा आढळलेला कोरोना विषाणुचा प्रकार मार्चपर्यंत अमेरिकेत प्रभावशाली होऊ शकतो. त्यामुळे, पूर्वीपेक्षा अधिक गंभीर आजाराची शक्यता नसली तरी तो अधिक सहजपणे पसरत असल्याने रुग्णालयात दाखल करण्याचे व रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

आम्ही कोरोनाच्या नव्या प्रकाराला अतिशय गांभीर्याने घेतले आहे. कोरोना संसर्गाचा वेग कमी करणे, हाच त्याच्या नव्या प्रकाराला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे, शक्य ते सर्व उपाय करण्याची गरज आहे.
- डॉ. मायकेल मिना, संशोधक, हॉर्वर्ड विद्यापीठ, अमेरिका.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caution The speed of corona change is increasing researcher warning