न्यूयॉर्कवासीयांनी साजरा केला "वारिस अहलुवालिया दिन'

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

न्यूयॉर्क - धार्मिक सहिष्णुता आणि सद्‌भावनेचा प्रभावीपणे प्रचार केल्याबद्दल न्यूयॉर्क प्रशासनाने शीख-अमेरिकी अभिनेते आणि डिझायनर वारिस अहलुवालिया यांच्या सन्मानार्थ 19 ऑक्‍टोबर 2016 हा दिवस "वारिस अहलुवालिया दिन' म्हणून जाहीर केला. हा अत्यंत दुर्मिळ सन्मान समजला जातो.

न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल दि ब्लासिओ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात अहलुवालिया यांना गौरविण्यात आले. "अहलुवालिया दिन' जाहीर केल्याचे प्रमाणपत्र या वेळी त्यांना देण्यात आले. लेखक, अभिनेता, फॅशन डिझायनर आणि मॉडेल असलेल्या अहलुवालिया यांच्या प्रतिभेचे कौतुक करत ब्लासिओ म्हणाले, कायमच पगडी परिधान करणाऱ्या अहलुवालिया यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांत क्षमा, धार्मिक समजूतदारपणा आणि सहिष्णुता या मूल्यांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या या कृतीने नागरिकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला आहे. धर्माच्या नावाखाली कोणत्याही धर्मावरील हल्ला हा सर्व शहरावरील हल्ला समजला जाईल, असा इशाराही ब्लासिओ यांनी या वेळी दिला.

भारतीयांमध्ये मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीबाबत माहिती देणारी पुस्तिका सर्व शाळांमध्ये वाटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: celebration waris ahluwalia din