
उज्बेकिस्तानातील अजब प्रकार; बहिण-भावापासून जन्माला आलं बाळ! काही वेळातच मृत्यू
हिंदू समाजात असं म्हणतात की बहिण भावाने कधी लग्न करू नये, हे खूप अशूभ मानले जाते. याला आपण शक्यतो अंद्धश्रद्धा समजतो. पण कधी कधी अंद्धश्रदधेमागे वैज्ञानिक कारणही असू शकतं. बहिण भावाने लग्न केल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. पण सध्या एक प्रकरण बरंच गाजतय. एका बहिण-भावाने एकमेकांशी लग्न केल्याने काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याचं एक धक्कादायक उदाहरण म्हणता येईल. उज्बेकिस्तानच्या डस्टलिकमझमधील ही घटना आहे.
हेही वाचा: दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग
एका बहीण-भावाने लग्न केले आणि त्यांच्यापासून एका बाळाचा जन्म झाला पण त्यानंतर जे घडले, ते खूप धक्कादायक आहे. डस्टलिकमध्ये जन्मलेल्या या बाळामध्ये एक Genetic Disorder आढळला. जन्मानंतर अवघ्या काही तासांत बाळाचा मृत्यू झाला. हा Genetic Disorder होण्यामागील कारण म्हणजे ते दोघंही नात्याने भाऊ-बहीण होते.
हेही वाचा: दिल्ली-दुबई विमानाचं कराचीत इमरजन्सी लँडिंग
या बाळाचा जन्म ४ जूनला झाला होता. बाळाचं वजन हलाखीचं होतं. स्कीनपण खूप कमजोर होती. डॉक्टरांच्या मते, या बाळाला Ichthyosis congenita आजार होता. या आजारामुळे बाळाला आणखी अनेक आजार होण्याची शक्यता असते. बाळाला वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला मात्र डॉक्टर अपयशी ठरले. आणि जन्मानंतर अवघ्या दोन तासांत बाळाचा मृत्यू झाला.
या महिलेला पहिल्या नवऱ्यापासून असलेलं बाळ सुदृढ आहे मात्र दुसरा नवरा हा तिचा भाऊ होता त्यामुळे त्यांच्यापासून जन्माला आलेलं बाळाला हा आजार आढळला आणि काही तासात बाळाचा मृत्यू झाला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Web Title: Child Born From Brother Sister Died Within 2 Hour Due To Genetic Disorders
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..