चीनच्या उलट्या बोंबा; वाचा देश-विदेशच्या महत्त्वाच्या ७ बातम्या

esakal7.jpg
esakal7.jpg

देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने देशात चाळीस लाखांचा टप्पा पार केला केल्याने चिंता वाढली आहे. रेल्वेकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १२ सप्टेंबरपासून ४० नव्या विशेष रेल्वे पेअर्स धावणार आहेत. काँग्रेस नेत्याने भारताच्या ५ नागरिकांचे चीनने अपहरण केल्याचा दावा केला आहे. विदेशात, अमेरिकेत राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अमेरिकीचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी भारतीयांबाबत द्वेषपूर्ण भाषा वापरल्याचं एका ऑडिओ क्लिपच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. निवडणुका दोन महिन्यांवर येऊन  ठेपल्याने ट्रम्प यांनी पुन्हा मोदींची आठवण काढत त्यांचे कौतुक केलं आहे.

भय इथले संपत नाही; देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चाळीस लाखांच्या घरात

कोरोनाबाधितांच्या संख्येने देशात चाळीस लाखांचा टप्पा पार केला असून आज शनिवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 40,23,179 इतकी झाली आहे. मागील चोविस तासात 86,432 इतके नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांतील 1089 मृतांसह आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 69,561 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या भारतात 8,46,395 अॅक्टीव्ह केसेस असून 31,07,223 लोक यातून बरे झाले आहेत. सविस्तर बातमी-

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!

येत्या १२ सप्टेंबरपासून ४० नव्या विशेष रेल्वे पेअर्स धावणार आहेत. आणि या विशेष गाड्यांसाठी १० सप्टेंबरपासून रिझर्व्हेशन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली. यादव पुढे म्हणाले, याबाबतची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार ज्या ठिकाणी मोठी वेटिंग लिस्ट आहे, त्याठिकाणी ज्यादा गाड्यांची सोय करण्यात येईल. तसेच परीक्षा आणि राज्य सरकारच्या मागणीनुसार विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातील. सविस्तर बातमी-

चिनी सैन्याने 5 भारतीयांचे अपहरण केल्याचा दावा; काँग्रेस आमदाराने थेट PM मोदींकडे केली तक्रार

अरुणाचल प्रदेशमधून चिनी सैनिकांनी पाच भारतीयांचे अपहरण केल्याचे वृत्त समोर येत आहे. येथील काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार निनॉन्ग एरिंग  यांनी हा दावा केला आहे. चीन पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे अपहरण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी लडाखमध्ये दोन्ही देशात तणावपूर्ण वातावरण असताना समोर येणारे वृत्त दोन्ही देशातील तणाव आणखी तापण्याचे संकेत देणारे आहे. सविस्तर बातमी-  

"लॉकडाऊनचा काहीही फायदा न झालेला भारत एकमेव देश"

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. भारत एकमेव देश असेल ज्याला लॉकडाऊनचा कोणताही फायदा झाला नाही, असं ते म्हणाले आहेत. चिदंबरम यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.  सविस्तर बातमी-

भारतीय महिलांबद्दल गलिच्छ वक्तव्य; अमेरिकेच्या माजी अध्यक्षाचा भारतद्वेष ऑडिओमधून आला समोर 

न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये प्रिंसटनमधील प्राध्यापक आणि लेखक गैरी जे. बास यांनी एका ऑडिओ क्लिपचा आधार घेत धक्कादायक खुलासा केला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये तत्कालीन राष्ट्रपती निक्सन आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांचा भारत आणि दक्षिण आशिया प्रति असलेला दृष्टीकोन दिसून येतो.  निक्सन यांनी भारतीय महिलांबाबत अत्यंत गलीच्छ भाषा वापरली आहे. निक्सन किंसिजर यांना म्हणणात, भारतीय महिला या जगातील सर्वाधिक अनाकर्षित आहेत. त्या कशा पुनरुत्पादित करतात, मला कळत नाही. सविस्तर बातमी-

'चोराच्या उलट्या बोंबा' चीन म्हणते; हक्काची एक इंच जमीनही सोडणार नाही

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगही यांच्यात शुक्रवारी रशियात दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. या बैठकीनंतर आता चीनने एक निवेदन जारी केले आहे. लडाख सीमाभागातील तणावाला भारत जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनाच्या माध्यमातून चीनकडून करण्यात आला आहे. चीन आपल्या हक्काची एक इंच जमीनही सोडणार नाही, अशा आक्रमक भाषेचा वापरही करण्यात आलाय.  सविस्तर बातमी-

"पंतप्रधान मोदी एक महान नेता, भारतीय-अमेरिकी मलाच मत देतील"

अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका २ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बाडयेन यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. अमेरिकेत २० लाख भारतीय-अमेरिकी नागरिक राहतात. यांची मतं आपल्याकडे ओढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. तसेच भारतीय-अमेरिकी नागरिक मलाच मत देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर बातमी-


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com