इस्लाम, मक्का असली नावे ठेऊ नका: चीन

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

बंदी घालण्यात आलेल्या इस्लाम, कुराण, मक्का, जिहाद, इमाम, सद्दाम, हज आणि मदिना या नावांचा समावेश आहे. बंदी घालण्यात आलेले नाव ठेवल्यास या मुलांची प्रशासकीय नोंदणी केली जाणार नाही

बीजिंग - चीनच्या शिनजियांग या प्रांतामधील बहुसंख्येने असलेल्या उघर मुस्लिम समुदायामधील लहान मुलांची नावे "सद्दाम', "जिहाद' अशी ठेवण्यात येऊ नयेत, असा आदेश येथील प्रशासनाने काढला आहे. येथील प्रशासनाच्या दृष्टीने "धार्मिक भावना भडकाविणाऱ्या' अशा किमान 12 नावांवर बंदी घालण्यात आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, चीनमधील कम्युनिस्ट पक्षाने लहान मुलांची नावे ठेवण्यासंदर्भात नियमावली प्रसिद्ध केली आहे. बंदी घालण्यात आलेल्या इस्लाम, कुराण, मक्का, जिहाद, इमाम, सद्दाम, हज आणि मदिना या नावांचा समावेश आहे. बंदी घालण्यात आलेले नाव ठेवल्यास या मुलांची प्रशासकीय नोंदणी केली जाणार नाही. शालेय शिक्षण वा इतर अशा इतर सुविधांसाठी ही नोंदणी आवश्‍यक आहे. या भागामध्ये उघर मुस्लिमांची सुमारे 1 कोटी इतकी लोकसंख्या आहे.

 शिनजियांगमध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत गेल्या काही वर्षांत शेकडो ठार झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, देशातील इस्लामी दहशतवादाचे संकट अधिक आव्हानात्मक होण्याचे भीती चिनी नेतृत्वास आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने काही महिन्यांपूर्वीच इराकमध्ये उघूर दहशतवादी "प्रशिक्षण' घेत असल्याचे चित्रीकरण प्रसिद्ध केले होते. या पार्श्‍वभूमीवर, दहशतवादाचा धोका हा अपेक्षेपेक्षा कितीतरी गंभीर असल्याचे मानले जात आहे.

चीनमधील धार्मिक व वांशिक अल्पसंख्यांकांचे "चिनीकरण' केले जावे, असे मत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केले आहे. परंतु, हे आव्हान अत्यंत जटिल असल्याचे स्पष्ट आहे

Web Title: China bans dozens of Muslim names for babies in Xinjiang