रशियाला चीनची मदत, रशियाकडून केली कच्च्या तेलाची आयात

चीनचा रशियन तेल आयातीचा दर वाढून 55 टक्क्यांसह विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
रशियाला चीनची मदत, रशियाकडून केली कच्च्या तेलाची आयात
Summary

चीनचा रशियन तेल आयातीचा दर वाढून 55 टक्क्यांसह विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

सध्या जागितक पातळीवरील राजकारण आणि देवाणघेवाण संदर्भात एक वेगळी बातमी समोर येत आहे. चीनने रशियाला मदतीचा हात देत त्यांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात सुरु केली आहे. सौदी अरेबियाला (Saudi Arabia) मागे टाकत रशिया (Russia) चीनचा (China) सर्वात मोठा तेल पुरवठादार (Supplier) बनला आहे. त्यामुळे चीनचा रशियन तेल आयातीचा (Import) दर वाढून 55 टक्क्यांसह विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

युक्रेन-रशिया युद्धामुळे मॉस्कोने (Moscow) बीजिंगला (Beijing) सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची विक्री केली आहे. सौदी अरेबियाला मागे टाकत आता रशिया चीनला सर्वाधिक तेल पुरवठा (Provider) करणारा देश बनला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे आणि अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे मागणी कमी होऊनही चीनने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली असल्याची माहिती मिळत आहे.

रशियाला चीनची मदत, रशियाकडून केली कच्च्या तेलाची आयात
मविआ सरकार बरखास्त होणार, संजय राऊतांचे स्पष्ट संकेत

दरम्यान, सरकारी रिफायनिंग कंपनी सिनोपेक आणि सरकारी झेनहुआ ​​ऑइलसह चिनी कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये रशियन कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. युरोपिय देश आणि अमेरिकेने रशियाकडील तेल खरेदीवर निर्बंध लादले आहेत. मार्चमध्ये रशियावर लादलेले निर्बंध आणखी वाढवत अमेरिका (US) आणि ब्रिटनने (UK) रशियन तेलावर बंदी घातली आहे. तर युरोपिय संघाने रशियन गॅसवर निर्बंध लादले आहेत.

चीनच्या सीमाशुल्क सामान्य प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये गेल्या महिन्यात सुमारे 8.42 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात झाली होती. यामध्ये पूर्व सायबेरिया पॅसिफिक महासागर पाईपलाईनद्वारे केला जाणारा पुरवठा आणि समुद्रमार्गे आयात करण्यात आली. यामुळे, चीनचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा स्त्रोत असलेला सौदी अरेबिया आता 7.82 दशलक्ष टनांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

रशियाला चीनची मदत, रशियाकडून केली कच्च्या तेलाची आयात
Eknath Shinde Live: हार्ट अटॅक आलेल्या देशमुखांची धक्कादायक आरोप करत घरवापसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com