कॅनडाच्या तिसऱ्या नागरिकाच्या अटकेचा चीनकडून खुलासा

शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

बीजिंग : कॅनडाच्या तीन नागरिकांना चीनमध्ये अटक करण्यात आली असून, तिसरी व्यक्तीचे नाव सारा मॅक्‍लव्हर असून, ही महिला चीनमध्ये बेकायदा काम करीत असल्याचे येथील परराष्ट्र मंत्रालयातर्फे गुरुवारी सांगण्यात आले. 

यापूर्वी चीनकडून कॅनडाचे रहिवासी असलेल्या दोघांना राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले. या घटनेवरून चीन व कॅनडा या देशांदरम्यान राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. आता साराला अटक केल्यानंतर चीनने तिच्या अटकेचे कारण स्पष्ट केले आहे. साराला प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनईंग यांनी पत्रकार परिषदेचे सांगितले. मात्र कशाप्रकारची कारवाई असेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मॅक्‍लव्हर या अर्ल्बटा येथे शिक्षिका असल्याचे कॅनडाच्या "नॅशनल पोस्ट' या वृत्तपत्राने म्हटले आहे.

हुवाई कंपनीते मुख्य वित्त अधिकारी मेंग वॅंगझोऊ यांना कॅनडात 1 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात व्हॅंकुव्हर येथे त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.