"अग्नी' क्षेपणास्त्रावरून चिनी माध्यमांची टीका

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पाकिस्ताननेदेखील या चाचणीला आक्षेप घेतला असल्याचे चिनी माध्यमांनी म्हटले आहे. कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "ग्लोबल टाइम्स'च्या संपादकीयमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

बीजिंग - भारताने "अग्नी' क्षेपणास्त्राची चाचणी घेत संयुक्त राष्ट्र संघाने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा कांगावा चीनमधील माध्यमांनी केला आहे.

पाकिस्ताननेदेखील या चाचणीला आक्षेप घेतला असल्याचे चिनी माध्यमांनी म्हटले आहे. कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "ग्लोबल टाइम्स'च्या संपादकीयमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतानेच नाही तर पाश्‍चिमात्त्य देशांनीदेखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: China criticizes India on Agni Test