'अरुणाचल'चा उल्लेख नसल्याने हजारो नकाशे नष्ट

china destroys 30 thousands of maps showing arunachal as part of india
china destroys 30 thousands of maps showing arunachal as part of india

बीजिंग: अरुणाचल प्रदेश आणि तैवान हा चीनचा भाग न दाखविल्याने तेथे प्रसिद्ध झालेले जगाचे 30 हजार नकाशे नष्ट केल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचाच भूभाग असल्याचा दावा चीनचा आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अंतर्गत व अविभाज्य भाग असल्याची भारताची भूमिका भारतीय नेते वेळोवेळी मांडत असतात. यासंदर्भात अरुणाचल प्रदेशला भेट देण्याबद्दलही चीनचा आक्षेप असतो. तैवानवरही चीन दावा सांगत आहे. काही देशांमध्ये पाठविण्यासाठी जगाचे नकाशे तयार करण्यात आल्याचे वृत्त येथील सरकारी मालकीच्या "ग्लोबल टाइम्स'ने दिले. मात्र, या 30 हजार नकाशांमध्ये तैवान हा स्वतंत्र देश असल्याचे दाखविले असून, भारत-चीन सीमेचे चुकीचे रेखांकन केल्याचे कारण देत "क्‍विंगदाओ'च्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ते नष्ट केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. भारत व चीनमधील तीन हजार 488 कि.मी.च्या प्रत्यक्ष ताबारेषेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 'चीनच्या सीमा शुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय नकाशा दर्शविणारे असे 30 हजार नकाशे नष्ट केले आहेत. चीनमध्ये या नकाशांची छपाई करण्यात आली होती. मंगळवारी हे वृत्त छापून आले आहे. हे नकाशे कोणत्यातरी देशाला पाठविण्यात येणार होते. मात्र, या देशाचे नाव समजलेले नाही. चीनच्या किंग्डाओमध्ये सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी हो नकाशे नष्ट केले. या नकाशांमध्ये तैवानला चीनपासून वेगळा देश दर्शविण्यात आले होते आणि चीन-भारत सीमेचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप होता.'

दरम्यान, चीनच्या या कृत्याचे इंटरनॅशनल लॉ ऑफ चायना फॉरेन अफेयर्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लियु वेंगजोंग यांनी समर्थन केले आहे. चीनने यासंबंधी उचललेले पाऊल योग्य आहे. कारण कोणत्याही देशाला त्याचे सार्वभौमत्व आणि श्रेत्रीय अखंडता ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तैवान आणि दक्षिण तिबेट हे भाग चीनचेच आहेत जे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार चीनचे अभिन्न भाग आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com