Fire In China : चीनमध्‍ये कारखान्याला भीषण आग; दुर्घटनेत 36 जणांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire In China

लोकांना आगीतून बाहेर काढण्यासाठी 200 हून अधिक कर्मचारी आणि 60 अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

Fire In China : चीनमध्‍ये कारखान्याला भीषण आग; दुर्घटनेत 36 जणांचा होरपळून मृत्यू

चीनमध्‍ये (China) भीषण आगीची घटना घडली असून, या आगीत मोठ्या प्रमाणात लोकांचा होरपळून मृत्यू झालाय. चीनच्या हेनान प्रांतातील (China Henan) आन्यांग शहरात एका कारखान्याला लागलेल्या आगीत 36 जणांचा मृत्यू झाला. यात दोन जण जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती देताना सरकारी माध्यमांनी सांगितलं की, आग विझवण्यासाठी 200 हून अधिक बचाव कर्मचारी आणि 60 अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, 3 तास प्रयत्न करुनही ही आग आटोक्यात आणता आलीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही आग वेनफेंग जिल्ह्यातील कैक्सिंडा ट्रेडिंग कंपनी लिमिटेडला लागली. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली असून अग्निशमन दलाच्या 63 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

हेही वाचा: Delhi Police : श्रद्धा हत्याकांडात पोलिसांना मिळाला महत्त्वाचा सुगावा; झडतीदरम्यान सापडली तीन हाडं अन् जबडा

दरम्यान, ही आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. स्थानिक वेळेनुसार, रात्री 8 वाजता ही आग आटोक्यात आणण्यात आली आणि रात्री 11 पर्यंत पूर्णपणे विझवण्यात आली. मंगळवारी सकाळपर्यंत या आगीत 36 जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण किरकोळ जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मात्र, अहवालानुसार अद्याप दोन जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.