चीनचा विक्रम; माउंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंचीवरुन उडवलं विमान

सर्वात जास्त उंचीवरून मानवविरहित विमान उडवण्याचा विक्रम चीनने केला आहे.
Airoplane
AiroplaneSakal

शांघाय : सर्वात जास्त उंचीवरून मानवविरहित विमान उडवण्याचा विक्रम चीनने केला आहे. वातावरणातील संरचना आणि पाण्याच्या वाफेची वाहतूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी माउंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंचीवरून विमान चीनने उडवले आहे. यावेळी विमानाने 9,032 मीटर उंचीवरून उड्डाण केले.

(China Flown Airship Record Altitude, Higher Than Mount Everest.)

हा विक्रम करत असताना या विमानाने 8 हजार 889 मीटर उंच असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवरून उड्डाण केलं आहे. 9 हजार 32 मीटरवरून उड्डाण करत असताना विमानाचा वेग हा 30 मीटर प्रति सेकंद एवढा होता. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून या विमानाने उड्डाण केले होते. बेस कॅम्पची उंची 4300 मीटर एवढी होती. अडीच टन वजन असलेल्या या विमानाचे नाव जिमू नं.1 असं असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

Airoplane
नवऱ्याच्या मृत्यूनंतर झाला छळ; मुलीसाठी 36 वर्षे 'पुरुष' म्हणून काढली
China's Aeroplane
China's AeroplaneSakal

CGTN च्या अहवानानुसार हे विमानाचा वापर हवामानातील माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. त्यातून हवेतील काळा कार्बन, धूळ कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन या घटकाची माहिती गोळा केली जाते. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर त्या वाफेचा पृथ्वीपासून 9 हजार मीटर उंचीपर्यंतच्या प्रवासावर चीनी शास्त्रज्ञ सध्या संशोधन करत आहेत. चीनच्या या मोहिमेमध्ये चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्स, तिबेट पठार संशोधन संस्था, अवकाश माहिती संशोधन संस्था, चांगचुन इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टिक्स, फाइन मेकॅनिक्स आणि "अर्थ समिट मिशन 2022" च्या मोहिमेतील देश सहभागी आहेत.

Airoplane
Gyanvapi Masjid सर्वेक्षण पूर्ण; विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

तिबेट पठारावरील पर्यावरणीय बदलांवर पश्चिम वाऱ्यांचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास सध्या चीनी शास्त्रज्ञांकडून होत आहे. याच मोहिमेत माउंट एव्हरेस्टपेक्षा जास्त उंचीवरून विमान उडवण्याचा विक्रम चीनने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com