मानवाधिकार भंगावरून चीनवर टीका; कारवाईसाठी मात्र आखडता हात

लंडन येथे जी-७ गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आहे.
मानवाधिकार भंगावरून चीनवर टीका; कारवाईसाठी मात्र आखडता हात
Summary

या समुदायाला बळजबरीने सरकारला हवे ते शिक्षण देणे, काम करवून घेणे, त्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी बळजबरीने नसबंदी करणे असे प्रकार होत असल्याबाबत अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.

लंडन : चीनमधील (China) उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या मानवाधिकार भंगाच्या घटनांवरून जी-७ (g7) देशांच्या गटाने आज चीनवर जोरदार टीका केली. मात्र, अधिकाधिक सामर्थ्यशाली होत असलेल्या चीनविरोधात ठोस कारवाई करण्याचा निर्णय मात्र घेतला गेला नाही. (china human rights g7 foreign ministers meeting london)

मानवाधिकार भंगावरून चीनवर टीका; कारवाईसाठी मात्र आखडता हात
तब्बल 10 वर्षांनी पितळ उघडे; दुसऱ्या नावाने पासपोर्ट काढून लंडन वाऱ्या

लंडन येथे जी-७ गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये चीनमधील शिनजिआंग प्रांतातील उइगर मुस्लिमांसह इतर अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारांवर चर्चा करण्यात आली. या समुदायाला बळजबरीने सरकारला हवे ते शिक्षण देणे, काम करवून घेणे, त्यांची लोकसंख्या कमी करण्यासाठी बळजबरीने नसबंदी करणे असे प्रकार होत असल्याबाबत अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. याबाबत ‘जी-७’ परिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. यावरून चीनवर टीका करण्यात आली असली तरी या गटातील ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या बड्या देशांनी चीनविरोधात एकत्र कारवाई करण्याचा निर्णय घेण्याऐवजी आपापल्या पातळ्यांवर जनजागृती करणे, चीनविरोधात कायदे करणे असे उपाय योजण्याचा निर्णय घेतला. ठोस कारवाई करण्याचा अमेरिकेचा विचार असला तरी ‘जी-७’ गटातील काही देशांनी चीनशी व्यापारी संबंध बिघडू नये म्हणून सावध भूमिका घेतली.

चीनकडून नाराजी व्यक्त

बीजिंग : मानवाधिकार मुद्द्यांवरून ‘जी-७’ गटांच्या परिषदेने केलेल्या टीकेवर चीनने नाराजी व्यक्त केली. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ होत असल्याचे चीनने म्हटले आहे. विकसनशील देशांना लस पुरविण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा ‘जी-७’ देशांनी करणे आवश्‍यक असताना ते दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहेत, अशी नाराजी चीनने व्यक्त केली आहे.

(china human rights g7 foreign ministers meeting london)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com