भारत - चीनने चर्चा करून मार्ग काढावा: अमेरिका

पीटीआय
बुधवार, 19 जुलै 2017

वॉशिंग्टन - भारत आणि चीन यांच्यात सिक्किम क्षेत्रावरून सुरू असलेल्या वादावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी शांततापूर्ण चर्चा करून मार्ग काढावा आणि एकत्र येऊन काम करावे, अशी आशा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्‍त्या हिथर नॉट यांनी व्यक्त केली आहे. 

भारत आणि चीनमध्ये सिक्कीममधील डोकलामच्या मुद्‌द्‌यावर तणाव वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकच्या भूमिकेबद्दल प्रश्‍न विचारला असता नॉट म्हणाल्या की, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देश एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करावा.

अमेरिकेच्या सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस समितीनेही चीनची वाढती आक्रमकता आणि सैन्य तयारी पाहून अमेरिकेने आशियात सक्रियता वाढवावी, असा सल्ला दिला आहे.

आर्म्ड सर्व्हिसेस समितीने म्हटले की, अमेरिकेने समुद्र क्षेत्रातील हालचालींवर आणि वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी काही महिन्यात मर्यादितच प्रयत्न केले आहेत. त्यामुळे दक्षिण चीन महासागरच्या मुद्‌द्‌यावर आपल्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असे चीनला वाटू लागले आहे. 

Web Title: China, India should discuss, hints USA