चीनची पाकिस्तान शेअर बाजारात 8.5 कोटी डॉलरची गुंतवणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

कराची : चीनमधील तीन शेअर बाजारांच्या समुहाने पाकिस्तान शेअर बाजारात(पीएसएक्स) सुमारे 8.5 कोटी डॉलर अर्थात पाकिस्तानी चलनातील 8.96 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिली आहे.

पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने नुकतीच 40 टक्के हिस्सेदारी अर्थात 32 कोटी शेअर्सची प्रतिशेअर 28 रुपयांप्रमाणे विक्री केली आहे. पाकिस्तानी चलनातील 8.96 अब्ज रुपये अर्थात 8.5 कोटी डॉलरला हा व्यवहार पार पडला आहे. चायना फायनान्शियल फ्युचर्स एक्सचेंज कंपनी, शांघाय स्टॉक एक्सचेंज आणि शेंझेन स्टॉक एक्सचेंज या तीन शेअर विनिमय बाजारांनी एकत्रितपणे 30 टक्के हिस्सेदारीची खरेदी केली आहे. 

त्याचप्रमाणे, पाक-चायना इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि हबीब बँक या दोन स्थानिक पाकिस्तानी कंपन्यांनी प्रत्येकी 5 टक्के हिस्सेदारीची खरेदी केली आहे. पाकिस्तानमध्ये एका कंपनीला एकावेळी कमाल 5 टक्के गुंतवणुकीस मंजुरी आहे. 

Web Title: china invests 85 million dollars in pakistan stock exchange