Tawang Clash: भारताच्या सीमेवरील कुरापती, जिनपिंगचं चीन काय संदेश देऊ पाहतंय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tawang Clash

Tawang Clash: भारताच्या सीमेवरील कुरापती, जिनपिंगचं चीन काय संदेश देऊ पाहतंय?

कोविडवर नियंत्रण मिळवण्यात चीन सपशेल अयशस्वी ठरले.

मग ते अपयश झाकण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांनी शेजारी देशांच्या सीमांवर सैनिकी कारवायां करायला सुरूवात केली

देशासाठी काहीतरी करण्याचा हा आभास निर्माण करताना शी जिनपिंग सरकार आंतरराष्ट्रीय राजकारणात नेमका काय संदेश देऊ पाहतेय.

अरुणाचल प्रदेशच्या तवांग सीमा क्षेत्रात भारत आणि चीनी सेनेदरम्यान झालेल्या चकमकींचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणात उमटताना दिसतायत.

भारताशी चांगले किंवा अगदी बरे संबंध राखण्यातही चीनला फारसा रस नाही, हेच या सीमेवरील कुरापतींवरुन लक्षात येत आहे.

चीनने ९ डिसेंबरला तवांग सीमा क्षेत्रात केलेल्या हल्ल्यामुळे चीनचा दुतोंडी स्वभावच उघड झाला आहे.

एकीकडे भारत अमेरिकेच्या संयुक्त सैन्यसरावावरही आक्षेप नोंदवणारा चीन दुसरीकडे अशाप्रकारे थेट चकमकींवर उतरतो, तेव्हा त्यातून काय संदेश जातो.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

अमेरिकेशी वाढती जवळीक खुपणारी

३० नोव्हेंबरला उत्तराखंडमध्ये भारत-अमेरिकेने संयुक्त सैन्यसराव केला होता.

चीनने लगेच त्यासंबंधी नाराजी व्यक्त केली आणि शहाजोगपणे भारताला १९९३-१९९६सीमा समझौता कराराचे पालन करण्याचा सल्ला दिला होता.

विशेष म्हणजे ते ठिकाण प्रत्यक्ष सीमारेषेपासून १०० किमी दूर होते. तरीही चीनने त्यावर आक्षेप नोंदवला.

अर्थात भारत-अमेरिकेने संयुक्त सैन्यसराव पूर्ण करत चीनच्या या आक्षेपाला धुडकावून लावले.

औली इथल्या सैन्यसरावामुळे दोन्ही देशांकडून वेगवेगळी विधाने करण्यात आली. त्यानंतर आठवडाभरातच तवांग सीमा क्षेत्रात चकमकीची घटना घडली.

भारत अमेरिका आणि क्याडचा भाग झाल्याचे चीनला फारसे पसंत पडले नाही. त्यामुळे त्यासाठी धडा शिकवण्यासाठीच चीनने या कुरापती काढल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय राजकारणात बांधले जात आहेत.

हेही वाचा: India-China Clashed : भारत-चीन संघर्षाची 108 वर्षे जुनी कहाणी; 'या' 5 घटनांनी बदलला इतिहास!

चीनमधील सरकार कोविडबाबतीत सपशेल हारले आहे.

काही केल्या तिथला कोविड आटोक्यात येण्याची चिन्हं नाहीत. उलट टाळेबंदीच्या चित्रविचित्र नियमांमुळे लोकांमधील असंतोष वाढत आहे.

अशावेळी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चीन शेजारी देशांच्या सीमांवर काहीतरी लष्करी संघर्ष करून देशासाठी काही केल्याचा आभास करू पाहतो.

तिसऱ्यांदा हाती आलेला चीनचा कारभार हाकणं जिनपिंग सरकारला भलतंच अवघड जाताना दिसतंय. त्याचीच परिणती अशा हल्ल्यांत होताना दिसत आहे.

हेही वाचा: India-China Tawang Clash: भारत-चीन संघर्षानंतर केंद्रानं यापूर्वी उचललं होतं मोठं पाऊल; आता काय?

एकीकडे प्रशांत महासागर आणि मध्य पूर्वेकडे चीनला नवे राजकीय, व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करायचे आहेत.

दुसरीकडे भारताच्या सीमेवर लष्करी दबाव वाढवून चीनला नवीदिल्लीला एक छुपा संदेश द्यायचा आहे की, त्यांच्या सैन्याची स्थिती नाजुक आहे.

शिवाय अमेरिका आणि क्वाडबरोबरच्या भारताच्या संबंधांवरही त्यातून लक्ष ठेवता येईल.

मोदी सरकारने आधी आपल्या शेजारी राष्ट्रांच्या सीमेवर लक्ष द्यावे आणि मग वैश्विक राजकारणावर लक्ष द्यावे, असंच चीनला सांगायचं आहे.

हेही वाचा: भारत-चीन युद्धातील वीरांची शौर्य गाथा

पाकिस्तानला मदत

दक्षिण आशियासोबत भारताची वाढती जवळीक चीनला अजिबात पसंत पडलेली नाही. त्यामुळेच निरनिराळ्या प्रकारे चीन भारताला त्रास देऊ पाहत आहे.

त्यातीलच एक पाऊल म्हणजे, पाकीस्तानला बळ पुरवणे.

चीन पाकिस्तानला लांब पल्ल्याच्या पाणबुड्या देऊ शकते.

ज्यामुळे हिंद सागरापलिकडूनही भारतावर नजर ठेवता येऊ शकते.