भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

याआधी, ग्लोबल टाईम्स या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीच्या वृतपत्रामधील लेखाच्या माध्यमामधून भारतामधील गुंतवणूक कमी करण्याचा इशारा चिनी कंपन्यांना देण्यात आला होता

नवी दिल्ली - "भारत-भूतान-चीन' सीमारेषेवर (ट्रायजंक्‍शन) भारत व चीन या दोन देशांचे सैन्य एकमेकांसमोर ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून आज (शनिवार) भारतास जाणाऱ्या नागरिकांना "सावधानेतचा इशारा' देण्यात आला. सिक्कीम सेक्‍टरमधील दोकलाम येथे झालेल्या या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर चिनी नागरिकांना अशा स्वरुपाचा इशारा देण्याचे संकेत चीनकडून याआधी देण्यात आले होते.

"चिनी सरकारच्या दृष्टिकोनामधून परदेशांमधील चिनी नागरिकांची सुरक्षा, कायदेशीर अधिकार आणि हित अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,'' असे येथील परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्‍त्याने सांगितले. याआधी, ग्लोबल टाईम्स या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीच्या वृतपत्रामधील लेखाच्या माध्यमामधून भारतामधील गुंतवणूक कमी करण्याचा इशारा चिनी कंपन्यांना देण्यात आला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​
तब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण​

Web Title: China issues safety alert for chinese citizens travelling to India