चीनचं सगळं उलटच; कोरोनावर मात करण्यासाठी लशी 'मिक्स' करण्याचा फंडा

china corona vaccine
china corona vaccine

बीजिंग : कोरोना व्हायरसची उत्पत्ती ज्या देशातून झाली तो चीन देश आता त्यांनीच तयार केलेल्या लशीची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, याच्या प्रयत्नात आहे.  सध्या अस्तित्त्वात असलेल्या लशींची कमी असलेली कार्यक्षमता सुधारण्यासाठी चीन वेगवेगळ्या कोविड लशींचे मिश्रण करुन त्यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या विचार करत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ आरोग्य तज्ञाने एका परिषदेत दिली आहे.. सध्या उपलब्ध असणाऱ्या लशींचा प्रभावीपणा फार जास्त नाहीये. त्यामुळे या लशींची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न वरिष्ठ तज्ज्ञांकडून केला जातोय. अशी माहिती सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल एँड प्रिव्हेन्शनचे प्रमुख गाओ फू यांनी दिली आहे. 

चीनमधल्या एका वरिष्ठ आरोग्य तज्ज्ञाने दिलेल्या या माहितीमुळे चीनची लस कमी कार्यक्षम असल्याच्या मुद्यावर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या बोललं गेलं आहे. चीन सध्या आपल्या अवाढव्य लोकसंख्येचे लशीकरण करण्याची मोहीम राबवत आहे तसेच आपली लस इतर देशांनाही निर्यात करत आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये कोरोना लशीकरणास सुरवात झाली आहे. आतापर्यंत चीनमध्ये 161 दशलक्ष लोकांना लस दिली गेली आहे. यापैकी बहुतांश लोकांना गरजेनुसार लशीचे दोन डोस दिले जात आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत 1.4 अब्ज लोकांपैकी 40 टक्के लोकसंख्येचं लशीकरण पूर्ण करण्याचा चीनचा मानस आहे.

मात्र, अनेकजण ही लस घेण्यासाठी फार उत्साह दाखवताना दिसत नाहीयेत. कारण आता चीनमध्ये बऱ्यापैकी जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने आहे तर चीनमधूनच सुरु झालेल्या या महासाथीचा उद्रेक बऱ्यापैकी नियंत्रणात आहे.  आरोग्य तज्ज्ञ गाओ यांनी याआधी लशीकरण हा कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्याचा प्रमुख प्रभावी उपाय असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, या 2021 वर्षीच्या अखेरीस ते 2022 च्या मध्यावधीपर्यंत चीनच्या एकूण लोकसंख्येच्या 70 ते 80 टक्के लशीकरण पूर्ण होईल. लशीची प्रभावक्षमता वाढवण्याचा एक उपाय म्हणजे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने तयार केलेल्या लशींचे डोस वापरणे, असं गाओ यांनी शनिवारी झालेल्या परिषदेत म्हटलं आहे. चीनच्या बाहेरील तज्ज्ञ सांगत असलेला हा एक पर्याय असल्याचंही गाओ यांनी नमूद केलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com