चीनमध्ये भूकंपात 19 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

सिच्युआन प्रांताला सात रिश्‍टर स्केलचा धक्का

बीजिंग: चीनमधील सिच्युआन प्रांताला भूकंपाचा मोठा धक्का बसला असून, त्यात 19 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती सरकारी माध्यमांनी आज दिली. मंगळवारी रात्री उशिरा बसलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर सात एवढी होती, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने म्हटले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांत सहा पर्यटकांचा समावेश आहे. भूकंप प्रभावीत भागातून 45 हजार पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे चीन सरकारतर्फे सांगण्यात आले.

मुख्यत्वे डोंगराळ भाग असलेल्या सिच्युआन प्रांताला मंगळवारी रात्री सात रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला असून, त्यात 19 जण मृत्युमुखी पडले तर 247 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सहा पर्यटकांचा समावेश आहे. सिच्युआन हा विरळ लोकसंख्येचा भाग आहे. या भागाला वारंवार भूकंपाचे धक्के बसत असतात. याच भागात 2008मध्ये बसलेल्या भूकंपाच्या मोठ्या धक्‍क्‍यांमध्ये सुमारे 70 हजार जण मृत्युमुखी पडले होते.

मंगळवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू गुआंग्युआन शहरापासून दोनशे किलोमीटर अंतरावर आणि जमिनीत सुमारे दहा किलोमीटर खोलीवर असल्याचे अमेरिकी भूगर्भशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. चीनमधील वायव्येकडील शिंजिआंग प्रांतातील दुर्गम भागालाही बुधवारी 6.6 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला असल्याची माहिती चीन सरकारकडून देण्यात आली. या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे 32 जण जखमी झाले असल्याचे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.

45 हजार पर्यटकांना हलविले
भूकंपामुळे सिच्युआन प्रांतात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, त्यामुळे काही भागांचा संपर्क तुटला आहे. या भागात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे चीनच्या आपत्ती निवारण विभागाकडून सांगण्यात आले. एकूण 19 जण मृत्युमुखी पडले असून, त्यात सहा पर्यटकांचा समावेश आहे, असे सिच्युआन प्रांतिक सरकारतर्फे सांगण्यात आले. भूकंपामुळे प्रभावीत झालेल्या भागातून सुमारे 45 हजार पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Web Title: china news china earthquake 19 killed