तिबेटच्या पठारावर चीनचा युद्धसराव

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

लष्कराची जलदकृती क्षमता वाढविण्यावर भर

बीजिंग: "डोकलाम'प्रकरणी भारतावर दबाब टाकण्याचे प्रयत्न चीनकडून सातत्याने सुरू असून, या पार्श्वभूमीवर चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीने (पीएलए) तिबेटमध्ये 11 तास युद्धसराव केल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराची जलद कृती क्षमता वाढविणे, हा युद्ध सरावाचा हेतू असल्याचे वृत्त चिनी माध्यमांनी दिले आहे.

लष्कराची जलदकृती क्षमता वाढविण्यावर भर

बीजिंग: "डोकलाम'प्रकरणी भारतावर दबाब टाकण्याचे प्रयत्न चीनकडून सातत्याने सुरू असून, या पार्श्वभूमीवर चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीने (पीएलए) तिबेटमध्ये 11 तास युद्धसराव केल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराची जलद कृती क्षमता वाढविणे, हा युद्ध सरावाचा हेतू असल्याचे वृत्त चिनी माध्यमांनी दिले आहे.

या युद्धसरावाचा एक व्हिडिओ चीनच्या सेंट्रल टेलिव्हिजनवर (सीसीटीव्ही) प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात चिनी सैनिक हॉवित्झर, विमानविरोधी तोफा, ऍण्टी टॅंक ग्रेनेड, रडार युनिटचा वापर करताना दिसून येत आहेत. तिबेट कमांडमधील सैनिक या सरावात सहभागी झाले होते. ही तुकडी तिबेटमधील "यारलुंग झॅग्बो' नदीलगतच्या प्रदेशात पूर्वीपासून तैनात आहे. हा युद्धसराव केव्हा, आणि का झाला. याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही, असे सीसीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, चीनी लष्कराने यास एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दुजोरा दिला.

आगामी काळात लष्कराची कार्यतत्परता वाढविण्याबरोबर सीमेवरील तुकड्यांना तातडीने मदत कशी उपलब्ध करता येईल, या बाबी या युद्धसरावादरम्यान तपासून पाहण्यात आल्या. हाच या युद्धसरावामागील मुख्य उद्देश असल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला असून, अरुणाचल प्रदेशच्या मोठ्या भूमागावर दावा सांगणाऱ्या चीनने घेतलेला हा युद्धसराव भारतासाठी एक इशारा असल्याचे मानले जात आहे.

नवीन रणगाड्यांची चाचणी
चिनी लष्करात नव्याने दाखल झालेले रणगाडेही या युद्धसरावात सामील झाले होते. 35 टन वजन असलेल्या या रणगाड्यांसह नव्याने विकसित केलेल्या इतर उपकरणांची चाचणीही या वेळी घेण्यात आली. शत्रूची विमाने तसेच, त्यांची ठिकाणे शोधून त्यांना अचूकपणे लक्ष्य करण्याचा सराव या वेळी करण्यात आला.

Web Title: china news china soldier and tibet